Cambodia-Thailand agrees to Ceasefire start from tonight
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले कंबोडिया आणि थालंडमध्ये संघर्ष अखेर संपला आहे. मलेशियाच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी सोमवारी (२८ जुलै) संध्याकाळपासून दोन्ही देशांत युद्धबंदी लागू होणार आहे. दोन्ही देशांनी तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदी करण्यात आली आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी याची घोषणा केली आहे.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आज थायलंड, कंबोडिया आणि मलेशियाचा मध्ये सीमावादावर शांतता चर्चा झाली. या चर्चेत थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट सहभागी झाले होते. दरम्यान दोन्ही देशांनी कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदीवर सहमती दर्शवली. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी याची घोषणा केली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी २५ जुलै रोजी हा संघर्ष सुरु झाला होता. दोन्ही देश एकमेकांवर प्रथम गोळीबार केल्याचा आरोप करत होते. या संघर्षात ३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान आता दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला असून यामध्ये मलेशियाने महत्वपूर्व भूमिका बजावली आहे. सध्या युद्धबंदीच्या इतर बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत.
NOW – Cambodia and Thailand agree an “immediate and unconditional ceasefire” with effect from midnight tonight. pic.twitter.com/9UZUPSBPQ8
— Disclose.tv (@disclosetv) July 28, 2025
दरम्यान शनिवारी २६ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडियाल तात्काळ युद्धबंदीची चेतावणी दिली होती. त्यांनी दोन्ही देशांना तातडीने युद्धबंदी लागू करण्यास सांगितले होते, असे न केल्यास अमेरिका या देशांसोबत कोणताही व्यापार करणार नाही असे त्यांनी म्हटले होते. परंतु त्यानंतरीही दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु होता. दरम्यान यानंतर मलेशियाने मध्यस्थीचा प्रस्ताव दोन्ही देशांसमोर मांडला आणि अखेर आज झालेल्या शांतता बैठकीत थायलंड आणि कंबोडियात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.
थायलंड आणि कंबोडियातील हा ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.