Can role of these 'Muslim religious leader' Stop Nimisha Priya's Hanging
भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. १६ जुलै रोजी तिला फाशी देण्यात येणार असून तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि भारत सरकार प्रयत्न करत आहे. तिच्या फाशीसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ राहिला आहे.
केंद्र सरकारेन दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कुटुंबाने पीडीताच्या कुटुंबाला ‘ब्लड मनी’ देण्याचे म्हटले आहे. परंतु अद्याप तिची शिक्षा थांबलेली नाही. याच वेळी भारताचे ग्रॅंड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलिर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी निमिषाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहे.
ग्रॅंड मुफ्तींनी निमिषाची फाशी माफ करण्याची विनंती केली आहे. सध्या याची जगभर चर्चा सुरु आहे. याचे नेतृ्त्व येमेनचे प्रसिद्ध सूफी विद्वान शेख हबीब उमर करत आहे. सोमवारी (१४ जुलै रोजी) हबीब उमर यांच्या प्रतिनिधी हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी येमेन सरकारचे प्रतिनीधी, सर्वोच्च न्यायाधीश, पीडिताचे कुटुंबव आदिवासी नेत्यांशी चर्चा केली आहे. येमेनमध्ये ही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.
भारताचे ग्रॅंड मुफ्ती यांच्या विनंतीवरुन चर्चा निमिषाची फाशी माफ होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ग्रॅंड मुफ्ती हे नेमके कोण आहेत असाही प्रश्न विचारला जात आहे.
शेख अबूबकर अहमद यांना कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार म्हणून ओळखले जाते. हे भारतातील दहावे मु्स्लिम धर्मगुरु आहे. त्यांचा जन्म २२ मार्च १९३१ मद्ये केरळच्या कोझिकोड येथे झाला होता. २०१९ साली दिल्लीतील नवाज शांतता परिषदेत त्यांची भारताचे ग्रॅंड मुफ्ती म्हणून निवड झाली. दक्षिण भारतातून निवडलेले गेलेल पहिले ग्रॅंड मुफ्ती ठरले.
त्यांनी देशाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यातही हातभार लावला आहे. २०१४ मध्ये ISISविरोधात त्यांनी फतवा जारी केला होता. त्यांनी विविधतेने नटलेल्या भारताला शांतात व एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य केले आहे. अबूबकर यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली आहे. तसेच हजारो शाळा आणि महाविद्यालयांचे देखील संचालन अबूबकर करतात.
त्यांना UAE चा गोल्डन व्हिसा, मेलेशियाचा तोकोह मॉल हिजरा पुरस्कार आणि सौदी अरेबियाचा इस्लामिक हेरिटेज पुरस्कार मिळाला आहे. जगातील प्रभावशाली मुस्लिमांमध्ये त्यांना गणले जाते. पोप धर्मगुरुंसह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संवाद त्यांनी साधला आहे. त्यांनी नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे. यामुळे त्यांच्या हस्तक्षेपामुळे निमिषाची फाशी माफ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.