युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि उपराष्ट्राध्यक्ष युलिया स्विरिडेन्की (फोटो सौजन्य: एक्स/@ZelenskyyUa)
कीव : सध्या रशिया युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर तीव्र हल्ले करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याची चर्चांणा सध्या उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी उपराष्ट्राध्यक्ष युलिया स्विरिडेन्की यांना देशाचे पुढली राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्वात मांडला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्कींनी युलिया स्विरिडेन्को यंच्याकडे सरकारमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.
युलिया स्विरिजेन्को यांनी युक्रेनियन सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी युक्रेनच्या आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय राष्ट्रपती कार्यालयातीलही युलिया डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान झेलेन्स्की यांनी त्यांनी पुढील राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव सुचवले असून हा एक मोठा आणि खळबळजनक निर्णय मानला जात आहे. गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान झेलेन्स्कींचा हा प्रस्ताव देशात सत्तापरिवर्तनाची वाटचाल मानला जात आहे.
I held a meeting with First Deputy Prime Minister Yuliia Svyrydenko. A report was delivered on the implementation of agreements with European and American partners regarding support for Ukraine reached during the recent Ukraine Recovery Conference. We must swiftly implement… pic.twitter.com/AIipRnpA1f — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) July 14, 2025
युलिया स्वीरिडेन्को यांचा जन्म २५ डिसेंबर १९८५ मध्ये युक्रेनमधील चेर्निव्हिव्ह शहरात झाला होता. त्यांनी कीवच्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड ऑफमध्ये २००२८ मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी इकॉनॉमिक्समधून ऑनर्ससह बॅचलर पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी अनेक पदव्युत्तर कार्यक्रम देखील पूर्ण केले आहेत. त्यांनी युक्रेनियन ॲंडोरन रिएल इस्टेट कंपनीत आर्थिक अर्थशास्त्रज्ञ म्हणून कामकाज पाहिले आहे. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात झाली.
सध्या त्या युक्रेनच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि अर्थमंत्री आहेत. याशिवाय त्यांनी युक्रेन-अमेरिका पृथ्वी आणि खनिज करारातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ३० एप्रिल रोजी अमेरिका आणि युक्रेनमध्ये ऐतिहासिक करार करण्यात आला होता. या करारावर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांच्यासोबत युलिया यांनी स्वाक्षरी केली होती.
दरम्यान झेलेन्स्की यांनी त्यांना पुढी राष्ट्राध्यक्ष बनवण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये, “युक्रेनमध्ये कार्यकारी बदलाची प्रक्रिया सुरु होत आहे. मी युलिया स्विरिडेन्को यांना सरकारचे नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी आणि प्रशाकीय कामात सुधारणा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. भविष्यातील नवीन सरकारच्या मोठा बदल घडवून आणण्यासाठी तयार आहोत.