इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; पॅलेस्टिनी परतत आहेत गाझाला
पॅलेस्टाईन : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु होतं. मात्र, आता दोन वर्षांनंतर, इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम झाला आहे. युद्धविराम लागू होताच लोक गाझा शहराकडे जाऊ लागले. गाझामध्ये आता लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले आहे. युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या नवीन फुटेजमध्ये गाझा शहरातील परिस्थिती दिसून येत आहे.
गाझा येथील शनिवारी घेतलेल्या फुटेजमध्ये ताल अल-हवा परिसरात फक्त काही इमारती उभ्या असल्याचे दिसून येते. इतर इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. गाझा शहरातील परिस्थिती बिकट असल्याचे पाहिला मिळाले. वाहनांच्या छतांवर ढिगाऱ्यांचे ढीग, रस्ते काँक्रीटच्या धुळीने झाकलेले दिसत आहेत. गाझा शहराची हिरवळही जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे. UNEP नुसार, ९७ टक्के झाडे, ९५ टक्के झुडपे आणि ८२ टक्के पिके नष्ट झाली आहेत. जागतिक बँकेचा अंदाज आहे की, गाझा पुनर्बांधणीसाठी ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असणार आहे.
हेदेखील वाचा : ‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा
दरम्यान, गाझा शहरातील वीस लाखांहून अधिक लोक आता हळूहळू आपले जीवन पूर्वपदावर आणताना दिसत आहेत. हमाससोबत युद्धबंदी सुरू होताच इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शांतता प्रयत्नांचा विस्तार करण्याची घोषणा केली.
शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर पक्षांच्या मध्यस्थीद्वारे इस्रायल आणि हमासमधील शांतता चर्चा शक्य होण्याची शक्यता आहे. मागील शांतता प्रयत्न अनेक वेळा केले गेले आहेत, परंतु ते विविध कारणांमुळे अयशस्वी झाले आहेत.
2008 मध्येही युद्धविराम
इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यातील पहिला सहा महिन्यांचा युद्धविराम १९ जून २००८ रोजी सुरू झाला, ज्यामध्ये हमासने रॉकेट हल्ले थांबवण्याचे आणि इस्रायलने गाझावरील नाकेबंदी कमी करण्याचे आश्वासन दिले. हमासच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात हा एक प्रमुख उपक्रम होता. तथापि, हा करार डिसेंबर २००८ मध्ये कोसळला, ज्यामुळे २००८-०९ च्या गाझा युद्धाला सुरुवात झाली.