
us minuteman iii doomsday missile test california iran war tensions
US Minuteman III missile test March 2026 : जगाचे डोळे सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाकडे (Iran-Israel War )लागले असतानाच, अमेरिकेने आपल्या भात्यातील सर्वात जुन्या पण सर्वात घातक ‘ब्रह्मास्त्राची’ यशस्वी चाचणी करून शत्रू राष्ट्रांना मोठा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता, जेव्हा संपूर्ण जग झोपेत होते, तेव्हा अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘मिनिटमन III’ (Minuteman III) हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) आकाशात झेपावले. याला ‘डूम्सडे मिसाईल’ (प्रलय आणणारे क्षेपणास्त्र) म्हटले जाते, कारण यात एकाच वेळी संपूर्ण शहर राख करण्याची क्षमता आहे.
अमेरिकन स्पेस फोर्सच्या माहितीनुसार, या चाचणीला ‘GT 254’ असे नाव देण्यात आले होते. हे क्षेपणास्त्र कोणत्याही अणुबॉम्बशिवाय (Unarmed) डागण्यात आले होते. सांता बारबराजवळील तळावरून सुटल्यानंतर या रॉकेटने हजारो किलोमीटरचा प्रवास केला आणि पश्चिम-मध्य पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटांजवळ आपल्या निर्धारित लक्ष्यावर अचूक मारा केला. ‘ग्लोबल स्ट्राईक कमांड’ने स्पष्ट केले की, ही चाचणी अनेक वर्षांपासून नियोजित होती, मात्र इराणसोबतच्या तणावामुळे याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’
मिनिटमन III ची ताकद ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्यापेक्षा २० पट अधिक शक्तिशाली अणुवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या एका क्षेपणास्त्रात आहे. १३,००० किलोमीटरची अफाट रेंज असल्यामुळे अमेरिकेत बसून रशिया, चीन किंवा इराणमधील कोणत्याही कोपऱ्यात हे क्षेपणास्त्र काही मिनिटांत मृत्यूचा वर्षाव करू शकते. अमेरिकेकडे सध्या अशी साधारणपणे ४०० क्षेपणास्त्रे तैनात आहेत, जी २४ तास हाय-अलर्टवर असतात.
🚨🇺🇸 America Flexes Nuclear Muscle. The US test-fires a nuclear-capable Minuteman III missile off California. Official statements confirm it was scheduled years in advance, not tied to world events. pic.twitter.com/Y9JM6ST0ei — Roxom TV (@RoxomTV) March 5, 2026
credit – social media and Twitter
या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा ‘रिस्पॉन्स टाइम’. आदेश मिळाल्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी सज्ज होते, म्हणूनच याला ‘मिनिटमन’ असे नाव देण्यात आले आहे. १९७० पासून अमेरिकेच्या ताफ्यात असलेले हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ‘न्यूक्लियर ट्रायड’चा (जमीन, समुद्र आणि हवेतून अणुहल्ला करण्याची क्षमता) एक महत्त्वाचा हिस्सा आहे. २०३० पर्यंत अमेरिका याला नवीन ‘सेंटिनेल’ क्षेपणास्त्राने बदलणार आहे, पण तोपर्यंत मिनिटमन III हेच अमेरिकेचे मुख्य संरक्षक कवच असणार आहे.
Watch this operational test of an unarmed Minuteman III ICBM which launched Wednesday from @SLDelta30 Vandenberg SFB, Calif.
These routine tests validate & verify the weapon system’s safety, security, effectiveness & #Readiness.
@SpaceForceDoD video by Senior Airman Tiarra Sibley pic.twitter.com/2sDZn59DgB — United States Strategic Command (@US_STRATCOM) September 7, 2023
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ashmolean Museum: सांस्कृतिक वारसा परततोय! 500 वर्ष जुनी ‘ती’ पवित्र मूर्ती इंग्लंडहून मायदेशी परतणार; लंडनमध्ये भव्य हस्तांतरण
जरी अमेरिकन लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल केरी रे यांनी याला ‘नियमित चाचणी’ म्हटले असले, तरी जागतिक तज्ज्ञांच्या मते ही वेळ निवडीमागे मोठे राजकारण आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने आपली अण्वस्त्र सज्जता दाखवून इराण आणि त्यांच्या समर्थकांना बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. या चाचणीमुळे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांचा आत्मविश्वास वाढला असून शत्रू गोटात मात्र भीतीचे वातावरण आहे.
Ans: या क्षेपणास्त्राची रेंज साधारणपणे १३,००० किलोमीटर आहे, ज्यामुळे ते एका खंडावरून दुसऱ्या खंडावर मारा करू शकते.
Ans: हे क्षेपणास्त्र हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २० पट अधिक घातक अणुवस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.
Ans: ही चाचणी कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग स्पेस फोर्स बेस (Vandenberg Space Force Base) येथून करण्यात आली.