Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ; कोइरालांचा बालेकिल्ला आंदोलकांमुळे ‘असा’ कोसळला

Koirala Family: कोईराला कुटुंबाचा एकेकाळी नेपाळच्या राजकारणात प्रभाव होता. कुटुंबातील तीन सदस्यांनी पंतप्रधानपद भूषवले. कुटुंबाचे नातेवाईक सुशील कोईराला यांनीही नेपाळचे पंतप्रधानपद भूषवले होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 05, 2026 | 02:46 PM
nepal election 2026 koirala family struggle for survival political legacy ends

nepal election 2026 koirala family struggle for survival political legacy ends

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक वारशाचा अस्त
  • अंतर्गत फूट आणि भ्रष्टाचार
  • भारतासाठी चिंतेचा विषय

Nepal General Election 2026 results : नेपाळमध्ये सध्या ‘जनरल झेड’ (Gen-Z) चळवळीच्या वादळानंतर नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत (Nepal Election 2026) केपी शर्मा ओली, गगन थापा आणि बालेन शाह यांसारख्या नेत्यांची जोरदार चर्चा असतानाच, एका ऐतिहासिक नावाचा दबदबा मात्र पूर्णपणे ओसरल्याचे चित्र दिसत आहे. ते नाव म्हणजे ‘कोइराला कुटुंब’. ज्या कुटुंबाने नेपाळला मातृका प्रसाद, विश्वेश्वर प्रसाद आणि गिरिजा प्रसाद कोइराला यांच्यासारखे तीन दिग्गज पंतप्रधान दिले, तेच कुटुंब आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शेवटची लढाई लढत आहे.

एका जागेवर स्थिरावलेलं साम्राज्य

एकेकाळी नेपाळी काँग्रेस आणि कोइराला कुटुंब हे एकमेकांचे समानार्थी शब्द मानले जायचे. २०२२ च्या निवडणुकीतही या कुटुंबातील तीन सदस्य संसदेत पोहोचले होते. मात्र, २०२६ च्या या सार्वत्रिक निवडणुकीत नेपाळी काँग्रेसने केवळ शेखर कोइराला यांनाच तिकीट दिले आहे. त्यांनाही ‘मोरंग-६’ या अशा जागेवरून उमेदवारी मिळाली आहे, जो भाग प्रतिस्पर्धी यूएमएल (UML) पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. सुजाता कोइराला आणि शशांक कोइराला यांसारख्या बड्या नावांना डावलून पक्षाने कोइराला कुटुंबाला केवळ एका जागेपुरते मर्यादित ठेवले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

अस्तित्वाचा संघर्ष: कोइराला घराणे मागे का पडले?

कोइराला कुटुंबाच्या या घसरगुंडीमागे अनेक कारणे आहेत, पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अंतर्गत गटबाजी. गिरिजा प्रसाद कोइराला यांच्या निधनानंतर कुटुंबातील एकता संपुष्टात आली. सुजाता कोइराला आणि शशांक कोइराला हे शेर बहादूर देउबा यांच्या गटात सामील झाले, तर शेखर कोइराला यांनी स्वतःचा वेगळा गट निर्माण केला. या विखुरलेल्या शक्तीमुळे पक्षांतर्गत त्यांचे वजन कमी झाले.

Democracy in poverty. Today #Nepal votes again after a Gen-Z uprising toppled a two-thirds majority government. Yet corruption remains and basic needs are ignored. This poor woman crawling to vote shows the painful truth —even in suffering, people still believe in hope and change pic.twitter.com/9LyQUkAgXn — Dr Jagan Karki (@jaganbimal) March 5, 2026

credit – social media and Twitter

दुसरे मोठे कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे डाग. सुजाता कोइराला यांच्यावर सुदान घोटाळ्याचे आरोप झाले, तर शशांक कोइराला यांच्यावर पक्षाचा निधी गैरवापर केल्याचे गंभीर आरोप आहेत. २०२५ मधील इमिग्रेशन घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांचा बचाव केल्यामुळे जनतेमध्ये कोइराला कुटुंबाची प्रतिमा मलीन झाली. नेपाळमधील तरुण पिढीला (Gen-Z) घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा वीट आला असून, त्याचा फटका कोइराला कुटुंबाला बसला आहे.

भारत आणि कोइराला कुटुंबाचे रेशीमबंध

भारताच्या दृष्टीने कोइराला कुटुंबाचे राजकारणात असणे अत्यंत महत्त्वाचे होते. १९५१ आणि १९५९ मध्ये जेव्हा कोइराला कुटुंबातील सदस्य पंतप्रधान झाले, तेव्हा भारताने त्यांना पूर्ण पाठबळ दिले होते. नेपाळमधील भारतीय हितसंबंध जपण्यात या कुटुंबाने नेहमीच मोलाची भूमिका बजावली. आता कोइराला कुटुंबाचे महत्त्व कमी झाल्यामुळे नेपाळमधील भारताचा जुना विश्वासू मित्र कमकुवत झाला आहे, ज्याचा फायदा चीन समर्थक गट घेण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

काठमांडूच्या रस्त्यांवरील रोष

नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी कोइराला कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात तोडफोड आणि जाळपोळ केली. ‘जनरल-जी’ चळवळीच्या काळात हे कुटुंब जनतेच्या भावनांशी जोडून घेऊ शकले नाही, ज्यामुळे ग्रामीण भागातील त्यांचा जनाधार पूर्णपणे वाहून गेला. बालेन शाह यांच्यासारख्या नवीन नेत्यांच्या उदयाने कोइराला कुटुंबाच्या पारंपारिक राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. नेपाळची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर कोइराला कुटुंबाच्या ७५ वर्षांच्या राजकीय वारशाचे भविष्य ठरवणारी आहे. जर शेखर कोइराला आपली जागा वाचवू शकले नाहीत, तर नेपाळच्या इतिहासातील एका मोठ्या राजकीय अध्यायाचा शेवट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोइराला कुटुंबातील किती सदस्यांनी नेपाळचे पंतप्रधानपद भूषवले आहे?

    Ans: कोइराला कुटुंबातील ३ सदस्यांनी (मातृका प्रसाद, विश्वेश्वर प्रसाद आणि गिरिजा प्रसाद) पंतप्रधानपद भूषवले आहे, तर त्यांचे नातेवाईक सुशील कोइराला हे देखील पंतप्रधान होते.

  • Que: यंदाच्या निवडणुकीत कोइराला कुटुंबातील किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत?

    Ans: नेपाळी काँग्रेसने यंदा केवळ शेखर कोइराला यांनाच उमेदवारी दिली आहे, जे मोरंग-६ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • Que: कोइराला कुटुंबाचा राजकीय प्रभाव कमी होण्याची मुख्य कारणे काय आहेत?

    Ans: कुटुंबातील अंतर्गत फूट, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि नेपाळमधील नवीन 'जनरल झेड' पिढीचा घराणेशाहीला असलेला विरोध ही मुख्य कारणे आहेत.

Web Title: Nepal election 2026 koirala family struggle for survival political legacy ends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • elections
  • international news
  • nepal

संबंधित बातम्या

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?
1

धक्कादायक! व्हेनेझुएलातुन राकेशचा मृतदेह भारतात आणताच कुटुंब हादरलं! शरीरातून हृदय आणि मेंदूसह २१ अवयव गायब; नेमकं काय घडलं?

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला
2

Maharashtra Breaking News Updates Today: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर  वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.