China foreign minister Wang Yi to visit India today
India China Relations : नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वागं यी आज (१८ ऑगस्ट) भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. हा दोन दिवसांचा दौरा होणार असून अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि चीनमधील (India China Relation) संबंधामध्ये अलीकडच्या काळात सुधारणा होताना दिसून येत आहे. या दृष्टीकोनातून हा दौरा महत्वपूर्ण असून सगळ्याचे याकडे लक्ष लागलेले आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. यानंतर वांग यी पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी हा दौरा होत आहे. यावेळी परराष्ट्र मंत्री वांग यी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान भारत आणि चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्यासाठी उपायोजनांवर चर्चा होईल. ही भेट भारत आणि चीन संबंधामध्ये एक नव्या दिशेची वाटचाल म्हणून पाहिले जात आहे.
या मुद्द्यावर होणार चर्चा
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशात तीव्र संघर्ष झाला होता, यामुळे संबंध ताणले गेले. परंतु आता दोन्ही देशांमध्ये संबंध सुधार होत आहे. दोन्ही देशांनी संघर्षाच्या ठिकाणाहून आपले सैन्य माघारी बोलावले आहे. मात्र अद्याप पूर्णपणे शांतता निर्माण झालेली नाही. सध्या पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावर कायम आहे.
दरम्यान या भेटीत या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. वांग यी आणि डोवा सीमा चर्चेचे विशेष प्रतिनिधी आहेत. यापूर्वी डोवाल यांनी २०२४ डिसेंबर मध्ये चीनला भेट दिली होती. यावेळी देखील दोन्ही नेत्यांनी विशेष प्रतिनिधी चर्चा केली. तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि विमानासेवा पुन्हा सुरु करणाऱ्यावरही चर्चा होईल. ऑगस्टच्या अखेरपासून दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
या युद्धादरम्यान अमेरिकन टॅरिफवरही चर्चा होण्याची शक्यता
सध्य़ा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० % टॅरिफ लावले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यावरुन ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लागू केले असून यामध्ये दंड देखील समील आहे. याच पार्श्वभूमीवर वांग यी अजित डोवाल यांच्याशी टॅरिफच्या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी सोमवारी (१८ ऑगस्ट) दुपारी ४.१५ वाजता दिल्लीत पोहोचतील. यानंतर ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहे. या वेळी भारत आणि चीनच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा होईल. यानंतर मंगळवारी(१९ ऑगस्ट) ११ वाजता ते NSA अजित डोवाल यांच्याशी चर्चा करतील. यावेळी दोन्ही देशांमधील सीमावादावर चर्चा होईल. तसेच विमानसेववेरही चर्चा होई. याशिवाय व्यापारावरही चर्चा होईल. यानंतर ते संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.
India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट