China issued more than 85,000 visas for Indian's amid trade war with US
बिजिंग: सध्या अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्ध सुरुच आहे. सध्या अमेरिकेने चीनवरील टॅरिफमध्ये 100% वाढ करत 245% पर्यंत मोठे शुल्क लादले आहे. यामुळे आता चीनला मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागणार असून त्याच्या आर्थिक क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान दुसरीकडे चीनने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनने हिंदी-चीनी भाई-भाई म्हणत एक मोठी घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने भारतासाठी 85 हजाराहून अधिक व्हिसा जारी केले आहेत. भारतातील चीनी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 1 एप्रिल दरम्यान 85 हजाराहून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा मिळाला आहे. भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये संबंध दृढ करण्यासाठी चीनने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान भारतातील चीनी राजदूत झू फेईहोंग यांनी एक निवेदन जारी केली आहे. या निवेदनात त्यांनी भारतीय नागरिकांना चीनला भेट देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नागरिकांसाठी चीनच्या खुल्या आणि सुरक्षित आशा मैत्रीपूर्ण वातावरणाचा आनंद घेण्याचे आमंत्रण रादूतांनी दिले आहे.
चीनच्या राजदूतांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या बुधवारी (9 एप्रिल) पर्यंत भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी 85 हजारांहून अधिक भारतीयांना चीनला जाण्यासाठी व्हिसा जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बारतीय मित्रांचे चीनमध्ये मनापासून स्वागत आहे.
अमेरिकेसोबत सुरु असलेल्या व्यापर युद्धादरम्यान चीनने भारतासमोर मैत्रीपूर्ण हात पुढे केला आहे. तसेच मोठ्या संख्येमे भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवास करण्यासाठी व्हिसा जारी केला आहे.
याशिवाय, इतर अनेक सवलती देखील चीनने बारतीय नागरिकांनी दिल्या आहे. यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे चीन व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी भारतीय नागरिकांनी ऑनलाईन अपॉइंटमेंटची घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांसाछी व्हिसा अर्ज प्रक्रिया अगदी सुलभ होईल. तसेच भारतीय नागरिकांनी कमी कालावधीसाठी चीनला प्रवास केला असेल तर त्यांना त्यांचे बायोमेट्रिक सादर करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
सध्या अमेरिकेसोबत सुरु असलेल्या व्यापार वादादरम्यान चीनने एक मोठे पाऊल उचलेले आहे. दरम्यान भारताकडून अद्याप चीनच्या या निर्णयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारताचे अमेरिकेशी देखील चांगले संबंध आहेत. यामुळे आता चीनच्या या निर्णयावर भारताची काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशाचा कापड उद्योग आला गोत्यात; भारताच्या एका चालीने उडवली झोप