अमेरिकेच्या न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला दणका! भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यासंबंधी घेतला 'हा' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला मोठा झटका दिला आहे. भारतीय वंशाच्या 21 वर्षीय विद्यार्थी कृष लाल इस्सारदासानी यांच्या व्हिसा संबंधीत ट्रम्प प्रशासनाचा निर्णय पलटवला आहे. सध्या हे प्रकरण खूप चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने 4 एप्रिल रोजी विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात कप्युटरचे शिक्षण घेत असलेल्या इस्सारदास्सानी यांचा F1 व्हिसा कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केला. तसेच SEVIS डेटाबेसमधून वगळण्यात आले. ही प्रक्रिया अचानक आणि गुप्तपणे झाल्याने इस्सारदासानी यांना त्यांचे मत मांडण्याची संधीही मिळाली नाही.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाचे वकील शबनम लोटफी यांनी न्यायलयात धाव घेतली. त्यांनी तात्पुरत्या स्थगित आदेशशासाठी न्यायालयात याचिकता दाखल केली. त्यानंतर 15 एप्रिल रोजी फेडरल न्यायाधीश विलियम कॉनले यांनी ही याचिका मंजूर केली आणि अमेरिका गृृृह सुरक्षा विभागाला इस्सारदासानी यांना ताब्यात घेण्यापासून आणि व्हिसा रद्द करण्यापासून रोखले.
या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, क्रिश इस्सारदासानी यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांचा व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया अयोग्य आहे. कृष यांनी मांडलेली बाजू पुरेशी आणि विश्वासार्ह होती आणि यामुळे त्यांना तात्पुरती दिलासा मिळाला. पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे आणि तोपर्यंत त्यांना अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हा निर्णय केवळ एका भारतीय विद्यार्थ्यांकरिता मर्यादित नसून वकील शबनम लोटफी दिलेल्या माहितीनुसार, 1300 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी ठरू शकते. यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे SEVIS रेकॉर्ड अचानक रद्द करण्यात आले होते अशा विद्यार्थ्यांना एक आशा मिळाली आहे. तसेच शबनम लोटफी यांच्या सहकारी वकील वेरोनिका सुस्टिक यांनीही या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, न्यायालयाने या अन्यायाला ओळखले आणि योग्य न्याय दिला.
या प्रकरणामुळे SEVIS प्रणाली आणि व्हिसा रद्दीकरण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे अधिकार, त्यांचे भविष्य आणि शिक्षणाच्या संधी यांचे संरक्षण आवश्यक आहे. या प्रकरणावरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण कायद्याच्या मार्गोने करता येते. न्यायलही मानवाधिकार आणि न्यायावर विश्वास ठेवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशाचा कापड उद्योग आला गोत्यात; भारताच्या एका चालीने उडवली झोप