Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China News : तैवानच्या मित्रदेशातून नागरिकांना बाहेर पडण्याचा चीनचा सल्ला!

China News : चीनने सुरक्षा धोक्याचा हवाला देत आपल्या नागरिकांना तैवानचा राजनैतिक मित्रदेश असलेल्या एस्वातिनीमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. सायबर फसवणूक, ऑनलाइन जुगार आणि सार्वजनिक सुव्यवस्थेतील धोके हे अधिकृत कारण सांगण्यात आले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 26, 2026 | 06:50 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षेच्या कारणास्तव चीनचा इशारा
  • एस्वातीनी तैवानच्या महत्वाचा मित्रदेश
  • चीन तैवान संघर्षाचा राजनैतिक परिणाम
China News : तसे पाहिले तर चीन ने तिबेट गिळंकृत केलाच आहे . तसेच त्याचे शेजारील प्रत्येक देशासोबत सीमावाद सुरु आहे . स्वतः चीनकडे मोठा भूभाग असून देखील त्याला साम्राज्यवादाच्या मोहापासून दूर जाता आलेले नाही . असे राजकीय जाणकारांचे मत आहे . याच मोहापायी चीन तैवानला आपलाच भाग मानतो .

सुरक्षेच्या कारणास्तव चीनचा इशारा

चीनने आपल्या नागरिकांना एस्वातिनीमधून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे . देशातील सुरक्षा परिस्थिती गुंतागुंतीची असल्याचे सांगत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा इशारा दिला . विशेषतः सायबर फसवणूक , ऑनलाईन जुगार आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित धोके वाढल्याचे चीनने म्हंटले आहे .

चीनच्या मते एस्वातिनीमध्ये राहणाऱ्या किंवा तेथे जाणाऱ्या नागरिकांना सध्या अत्यंत उच्च सुरक्षा धोका निर्माण झाला आहे . चीनने एस्वातिनीमध्ये असलेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या तुलनेने सुरक्षित भागात स्थलांतर करणायचा सल्ला दिला आहे . चीनने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही पाऊले उचलली असल्याचे सांगितले आहे .

Islamabad : इस्लामाबादमध्ये काळीज पिळवटणारी घटना; रुग्णालयात एसीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 15 नवजात बालकांचा मृत्यू

एस्वातीनी तैवानच्या महत्वाचा मित्रदेश

या घटनेला केवळ एक सुरक्षा इशारा म्हणून पाहिले जात नाही . कारण एस्वातिनी हा तैवानसोबत अधिकृत राजनैतिक संबंध ठेवणारा आफ्रिकेतील एकमेव देश आहे . जगातील मोजक्या देशांपैकी एस्वातिनी अजूनही तैवानला राजनैतिक मान्यता देतो . चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो आणि तैवानला स्वतंत्र देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यास विरोध करतो .

त्यामुळे एस्वातिनीचे तैवानसोबत असलेले संबंध बीजिंगसाठी अत्यंत्य संवेदनशील मुद्दा आहे . या वर्षी मी महिन्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांनी एस्वातिनीला भेट दिली होती या दौऱ्याला चीनने तीव्र विरोध केला होता . दौऱ्यापूर्वी काही आफ्रिकी देशांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाला हवाई परवानगी नाकारल्याने वाद निर्माण झाला होता . तैवाननें यामागे चीनचा दबाव असल्याचा आरोप केला होता .

Nepal Flash Floods Impact : नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये चिंता का निर्माण वाढते? जाणून घ्या

चीन तैवान संघर्षाचा राजनैतिक परिणाम

चीनने यापूर्वीही आफ्रिकी देशांवर तैवानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्यासाठी दबाव आणला होता . एस्वातिनी मात्र अजूनही तैवानसोबत संबंध कायम ठेवत आहे . त्यामुळे आफ्रिकेतील तैवानच्या उरलेल्या राजनैतिक मित्रदेशांपैकी एस्वातिनीचे महत्व वाढले आहे . दरम्यान चीनने आफ्रिकेतील इतर देशांसाठी व्यापार सवलती जाहीर करताना एस्वातिनीला त्यातून वगळले असल्याचे वृत्त आहे .

त्यामुळे सुरक्षा इशाऱ्यासोबतच व्यापार आणि राजनैतिक दबावाचाही हा व्यापक भाग आहे का याबाबत चर्चा सुरु झाली आहे . सध्या चीनने एस्वातिनीविरोधात थेट राजनैतिक कारवाई जाहीर केली नाही . मात्र नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेला सल्ला आणि तैवानसोबतचे एस्वातिनीचे मजबूत संबंध यामुळे चीन तैवान संघर्षाचा आफ्रिकेतील राजनैतिक प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे .

Web Title: China news china advises citizens to leave taiwans ally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • China
  • Taiwan

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
2

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
3

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप
4

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.