
India China Relations
भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सचे माजी संपादक हू शिजिन यांनी भारताचे जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यस्था बनल्याबद्दल अभिनंदन करत टोमणा मारला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टकरत म्हटले आहे की, भारत चौथी सर्वात मोठा जागतिक अर्थव्यवस्था बनणे ही केवळ वेळेची बाब आहे.
भारत आजही चीनपेक्षा 16 ते 15 वर्षे मागे असल्याचे शिजिन यांनी म्हटले आहे. तसेच भारताला दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी अमेरिका किंवा चीनला मागे टाकवे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय भारताने जपानला मागे टाकून चीनला पुन्हा एकदा मोठी अर्थव्यवस्था बनण्याची संधी दिली असल्याचे हू शिजिन यांनी म्हटले.
2010 मध्ये चीन जपानला मागे टाकून दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. परंतु यावेळी जपान पाचव्या क्रमांकावर असून हू शिजिन यांनी टोमणा मारला आहे. त्यांनी जपानला सर्वात वाईट स्थितीतील देश म्हणत गेल्या काही वर्षात तो पहिल्या क्रमांकावरुन खाली घसरत थेट पाचव्या क्रमांकावर आला असल्याचे म्हटले आहे. जपानच्या उद्योगांबाबत सकारात्म, चांगल्या बातम्या आजकाल कमीच ऐकायला मिळतात असे म्हणत हू शिजिन यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान हू शिजिन यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. लोकांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी चीनवर टीका करत, येत्या काही वर्षात चीन देखील मागे पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. चीनला देखील जपानासारख्या संकटाचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे.
Congratulations to India. Regardless of this year or next, it’s only a matter of time before India’s GDP surpasses Japan’s to become the fourth largest economy. China’s GDP surpassed Japan’s in 2010, but at that time, China became the world’s second largest economy. In other… — Hu Xijin 胡锡进 (@HuXijin_GT) December 30, 2025
Ans: भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत उंची गाठत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
Ans: चीनने भारत चौथी जागतिक अर्थव्यवस्था बनणे केवळ एक बाब असून तो अजूनही चीनपेक्षा 16-15 वर्षांनी मागे असल्याचे चीनने म्हटले आहे.
Ans: भारताच्या यशावर चीनच्या सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सचे माजी संपादक हू शिजिन यांनी टोमणा मारला आहे.