
China's Shenzhou 20 astronauts return to Earth with samples of mice and other animals from space station for further testing
गोल्बल टाइम्स आणि चीनच्या विज्ञान अकादमीने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी चीनच्या शेनझोऊ-२१ अंतर्गत अवकाशात उंदीर, झेब्राफिश असे प्राणी घेऊन गेलेली एक तुकडी यांच्या नमुन्यांसह बीजिंगमध्ये पोहोचली आहे. पुढील संशोधनासाठी हे नमुने संशोधकांकडे देण्यात आले असून या नमुन्यांची ही बॅच अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चीनने अंतराळात अनेक जैविक सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे.
अंतराळात प्राणी पाठवून चीन जिवंत पेशींमध्ये अंतराळातील वातावरणामुळे कोणते बदल होतात, कोणता धोका आहे यांसारख्या उद्दिष्टांचा अभ्यास करत आहे. या मोहिमेअंतर्गत जीवनशैलीचा पृथ्वीवरील सजीवांवर काय परिणाम होतो, ज्यामध्ये हाडे, स्नायू, तसेच मानसिक आरोग्य, न्यूरोसिस्टम काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. या अंतर्गत चीनने पृथ्वीवर परतताच उंदरांच्या वर्तनाचा, त्यांच्या शरीरातील बदलांचा अभ्यास सुरु केला आहे. चीनने मोहिमेच्या पुढील टप्प्यात त्यांच्या पेशी पातळीची तपासणी करणार आहे. यामुळे भविष्यात दीर्घकाळ मानवी अंतराळ मोहिमांसाठी वास्तव शक्य आहे का याचा अभ्यास केला जाणार आहे.
याशिवाय तंत्रज्ञानासाठी लागणारी सामग्री देखील अंतराळातून आणण्यात आली आहे. यामध्ये टंगस्टन-हाफनियम मिश्रधातू, नवी चुंबकीय सामग्री, रिलॅक्सर फेरोइलेक्ट्रिक क्रिस्टल यांचे नमुने आहेत. या उद्देश अंतराळातील गुरुत्वाकर्षणात हे धातू कसे तयार होते, त्यांच्या रचना कशी आहे. तसेच त्यांची मजबूती, गुणधर्म, यांचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या चीनचे वैज्ञानिक याचा सखोल अभ्यास करत असून अंतराळात एक तळ बांधणी करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
चीनच्या या शेनझोऊ मोहिमेत फायर सायन्सचेही नमुने आहेत. यामध्ये अंतराळात चीनने एक ओव्हन देखील पाठवले होते. याअंतर्गत अंतराळात आग कशी लागते, त्याचा आकार, ऑक्सिजना प्रवाह पृथ्वीपेक्षा किती वेगळे आणि सुरक्षित आहे का याचा अभ्यास केला जाणार आहे. चीनच्या या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही मोहिम केवळ चीनसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Four mice and other samples brought back to Earth from #China‘s space station @CNSpaceStation for further testing pic.twitter.com/xvNXJJV26A — ShanghaiEye🚀official (@ShanghaiEye) November 16, 2025
तंदूरी धमका! स्पेस स्टेशनवर चीनी अंतराळवीरांकडून जिरो ग्रॅव्हिटीमध्ये पहिले बारबेक्यू, Video Viral
Ans: चीनच्या या अंतराळ मोहिमेत मानवांसोबत चार उंदिर पाठवले जाणार आहेत, ज्यामुळे अंतराळातील वातावरणाचा मानवावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करता येईल.
Ans: Shenzhou-21 मोहिमेत चीन अंतराळातील वातावरणाचा पृथ्वीवर सजींवार काय परिणा होतो, तसेच अंतराळात आगीचा प्रवाह आणि ती कशी लावायची यावर अभ्यास करत आहे.
Ans: चीन या Shenzhou-21 मोहिमेत जैविक शास्त्र, फायर सायन्सचा अभ्यास करुन भविष्यात दीर्घकाळ मानवी अंतराळ मोहिमांसाठी वास्तव शक्य आहे का हे जाणून घेण्याचा उद्देश आहे.