China's war drills near the Indian border again with robot dogs and high-tech science
बिजिंग : सध्या भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काही दविसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर चीनच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तसेच इतर महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. या भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. चीनने देखील यासाठी सहमती दर्शवली.
परंतु चीनची दुहेरी खेळी पुन्हा एकदा समोर आली आहे. एककीडे चीन संबंध सुधारण्याचा खेळ खेळत आहे. तर दुसरीकडे LaC वरील चीनच्या हालचालींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
चीनने भारताच्या सीमेलगत युद्धाभ्यास सुरु केला आहे. या युद्धसरावात चीनच्या पीएलए सैन्याने तोफा, आणि रायफलचा सराव, तसेच रोबोट डॉग देखील युद्दात उतरवले आहे. हे रोबोट ७० किलो वजनाचे आहेत. या रोबोट्सकडे आधुनिक असॉल्ट रायफल्स आणि रीकॉन पेलोड्स तैनात करण्यात आले आहेत. हे रोबोट्स कठी भूप्रदेशात, डोंगराळ भागांमध्ये सहजपणे ऑपरेट करता येतात. यासर्व घडामोडींवरुन चीनचा भारताविरोधी कट असल्याचे स्पष्ट होत आहे.
याशिवाय चीन भविष्यातील मानवी सैन्याच्या मार्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचे हे रोबोट सैनिक माणसांपेक्षा अधिक प्रभावी ठरु शकतात असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. हे रोबोटस सैनिक सध्या टार्गेट किंलीग, फायरिंग आणि कव्हर फायरचा युद्धाभ्यास करतच आहे. तसेच माणसे आणि वाहने यांच्यासह हे रोबोट्स नेटवर्कद्वारे देखील युद्ध लढून शकतात असे मानले जात आहे. याशिवाय ड्रॅगनने युद्धसरावात QBZ-191 JE/hN, QBU-191 स्नायपर, पोर्टेबल रॉकेट लॉन्चर्स आणि अत्याधुनिक ड्रोन्सचाही सराव सुरु केला आहे. हे ड्रोन सुसाईड मिशनसाठी उपयुक्त ठरतात.
सध्या चीनच्या भारताच्या सीमेलगत वाढत्या लष्करी कवायती देशाची चिंता वाढवत आहेत. यामुळे भारताच्या सीमेलगतच्या देशांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु भारताच्या सैन्याने चीनच्या कोणत्याही हल्लाला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. सध्या LaC वरील बारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे. परंतु चीनच्या या अत्याधुनिक शस्त्रांच्या लढाईला तोंड देणे भारतासाठी आव्हानात्मक आहे. भारताच्या सीमासुरक्षेसाठी चीनच्या धोरणाविरोधात सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.