Chinese Foreign Minister to meet PM Modi today
China Foreign Minister India Visit : नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी (१९ ऑगस्ट) त्यांनी दिल्लीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. या वेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधावर चर्चा केली. तसेच दोन्ही देशांतील धोणात्मक संबंधांना चालना देण्यावर भर दिली. दोन्ही देश एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून राहिले आहेत. आता भारत आणि चीनमध्ये संबंध सुधारत आहेत.
वांग यी यांनी भारत आणि चीनमधील सपूर्वेकडील संबंध पुनर्सुचित करण्यावर भर दिला. तसेच आशिया आणि संपूर्ण जगामध्ये पूर्ण निश्चितता आणि स्थिरता प्रदान करण्यावर भर दिला.
किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
वांग यी यांनी भारत आणि चीनमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही लक्ष्य केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. अलीकडे संपूर्ण जगात वेगाने बदल होत आहे. यामुळे गुडंगिरी, मुक्त व्यापार आणि आंतरराष्ट्रीय समस्या वाढत आहे. यांना तोंड देण्यासाठी भारत आणि चीनचे संबंध महत्वपूर्ण असल्याचे म्हटले.
एस. जशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आता वांग यी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहे. यावेळी भारत आणि चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्यासाठी उपायोजनांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि विमानासेवा पुन्हा सुरु करणाऱ्यावरही चर्चा होईल. ही भेट भारत आणि चीन संबंधामध्ये एक नव्या दिशेची वाटचाल म्हणून पाहिले जात आहे. ही एक विशेष प्रतिनिधी बैठक आहे. यापूर्वी अजित डोवाल यांनी २०२४ डिसेंबर मध्ये चीनला भेट दिली होती.
अजित डोवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींची वांग यी भेट घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही भेट होईल.
पंतप्रधान मोदींचा चीन दौरा
तसेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी पंतप्रधान चीनच्या शांघाय सहकार्य संघटना बैठकीला बीजिंगमध्ये उपस्थित राहतील. यामुळे वांग यी यांचा भारत दौरा आणि पंतप्रधान मोदींचा चीन दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…