किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
North Korea Threatens America and South Korea : सियोल : उत्तर कोरियाने (North Korea) अमेरिका आणि दक्षिण कोरियाला खतरनाक धमकी दिली आहे. यामागाचे कारण म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव सुरु केला आहे. या कृतीवर उत्तर कोरियाने संताप व्यक्त केला आहे. यामुळे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Joung Un) यांनी या लष्करी सरावाला युद्धासाठी उकसवणारी कारवाई म्हणून वर्णने केले असून सराव थांबवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा लष्करी सराव
उत्तर कोरियाने त्यांच्याविरोधात कोणत्याही कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. अमेरिका (America) आणि दक्षिण कोरियामधील (South Korea) सराव ११ दिवस सुरु राहणार आहे. हा सराव दरवर्षात दोन वेळा होता. यावेळी हा दुसरा सराव आहे. या सरावात २१ हजार सैनिकांचा सहभाग आहे. यातील १८ हजार सैनित दक्षिण कोरियाचे तर उर्वरित ३ हजार सैनिक अमेरिकेचे आहे. या सरावात कम्प्युटरवर आधारित कमांड पोस्ट ऑपरेशन्स तसेच फील्ड ट्रेनिंग सैनिकांना दिले जाते. याचा उद्देश उत्तर कोरियाकडून निर्माण होणाऱ्या किंवा भविष्यातील धोक्यांना तोडं देण्यासाठी तयारी करणे आहे.
पण अमेरिका आणि दक्षिण कोरियाने त्यांचा हा लष्करी सराव केवळ स्वसंरक्षणासाठी असल्याचे म्हटले आहे. मात्र उत्तर कोरियाने याला त्यांच्याविरोधातील कारवाई म्हणून संबोधले आहे.
उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री नो क्वांग चोल यांनी, या लष्करी सरावाला उत्तर कोरियाविरोधात संघर्षाची तयारी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही उकसवणाऱ्या कृत्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी दक्षिण कोरियाचे नवे अध्यक्ष ली जे म्योंग अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २५ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ते भेट घेणाक आहेत. याकडे राजनैतिक दृष्टीकोनातून पाहिले जात असून हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”