Dalai Lama's clear warning China's interference in my succession will not work
Dalai Lama succession plan : तिबेटी बौद्ध धर्मगुरु १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो लवकरच वयाची ९० वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांच्या उत्तराधिकारीबाबत जगभरात चर्चा रंगली आहे. विशेषतः चीनकडून त्यांच्या पुढील उत्तराधिकारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याने ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर दलाई लामांनी त्यांच्या १५ व्या उत्तराधिकाऱ्याबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली असून, त्याचा परिणाम चीनच्या अपेक्षांवर मोठा धक्का देणारा ठरू शकतो.
तिबेटी बौद्ध परंपरेनुसार, दलाई लामा हे पुनर्जन्म घेतात आणि त्यांचा पुढील अवतार म्हणजेच उत्तराधिकारी शोधला जातो. ही परंपरा गेली ६०० वर्षे जपली जात आहे. १४ वे दलाई लामा सध्या भारतातील धर्मशाळा येथे निर्वासित जीवन जगत आहेत. त्यांच्या वयानुसार, पुढील दलाई लामाच्या निवडीचा मुद्दा आता अत्यंत संवेदनशील बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत राजकीय व आर्थिक वादळाची शक्यता; नक्की काय आहे हे ट्रम्प यांचे ‘One Big Beautiful Bill’?
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दलाई लामांनी ठासून सांगितले की, “माझा उत्तराधिकारी तिबेटी बौद्ध परंपरेनुसारच निवडला जाईल. यात चीनची कोणतीही भूमिका नसेल.” त्यांच्या या विधानाने चीनच्या नेतृत्वाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. चीन सरकारने यापूर्वीच संकेत दिले होते की, पुढील दलाई लामा हा केवळ त्यांच्या मान्यतेनुसारच निवडला जाईल, अन्यथा तो अधिकृत मानला जाणार नाही.
#BREAKING | The 14th Dalai Lama has affirmed that the instituition of the Dalai Lama will continue
However, he has excluded any Chinese role in his re-incarnation@SaroyaHem brings you this report by @sidhant pic.twitter.com/HYMYUWyStb
— WION (@WIONews) July 2, 2025
credit : social media
चीनने तिबेटवर १९५० मध्ये ताबा मिळवल्यानंतर, तिथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी “पंचेन लामा” यांची निवडही चीनच्या इशाऱ्यावर केली, मात्र जगभरातील बौद्ध धर्मगुरूंनी त्या निर्णयाचा बहिष्कार केला होता. आता चीन दलाई लामाच्या निवडीवरही तशीच भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे.
दलाई लामा यांनी याआधीही सुचवले होते की, “पुढील दलाई लामा भारतातूनही जन्म घेऊ शकतात.” तिबेटी बौद्ध समाज आणि अनुयायांनी देखील चीनच्या हस्तक्षेपाविरोधात आपली एकजूट दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत, नेपाळ किंवा भूटानसारख्या बौद्ध प्रभावी देशांमध्ये दलाई लामांच्या पुनर्जन्माचा शोध घेण्यात येऊ शकतो.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, दलाई लामा यांनी पुन्हा एकदा शांतता आणि करुणेचा संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले, “धर्म, अध्यात्म आणि परंपरेचा आदर राखत चीनने धर्मात हस्तक्षेप करू नये. माझा उत्तराधिकारी कोण असेल हे वेळ आल्यावर स्पष्ट होईल, पण तो तिबेटी लोकांच्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीनेच ठरेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा पर्दाफाश! पहलगाम हल्ल्यावर QUAD चा ठाम संदेश; असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का
दलाई लामांच्या या घोषणेनंतर, चीनला तिबेटमध्ये आपली राजकीय पकड ठेवणे अधिक कठीण होणार आहे. तिबेटी बौद्ध परंपरेचा जागतिक आदर लक्षात घेता, चीनकडून निवडलेला कोणताही दलाई लामा जगभरात मान्यता मिळवू शकणार नाही. त्यामुळे, १५ व्या दलाई लामाच्या निवडीतून तिबेटचा आत्मसन्मान आणि चीनच्या दडपशाहीचा संघर्ष अधिकच उघड होणार आहे.