Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarique Rahman: 17 वर्षांनंतर ‘डार्क प्रिन्स’चे मायदेशी पुनरागमन; बांगलादेशात बदलाचे वारे, भारतासाठी आशा की धोक्याची घंटा?

Tarique Rahman यांनी स्वतःला जमातपासून दूर केले आहे, युनूस सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि 'बांगलादेश प्रथम' धोरणाचे समर्थन केले आहे. तारिक हे माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे पुत्र आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 25, 2025 | 12:30 PM
Dark Prince Tarique Rahman returns to his homeland after 17 years see if it is hope or alarm bell for India

Dark Prince Tarique Rahman returns to his homeland after 17 years see if it is hope or alarm bell for India

Follow Us
Close
Follow Us:
  •  बीएनपीचे (BNP) नेते आणि बेगम खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या वनवासानंतर लंडनहून बांगलादेशात परतले असून ढाक्यात ५० लाख समर्थकांनी त्यांचे स्वागत केले.
  •  तारिक रहमान यांनी कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’पासून अंतर राखत ‘बांगलादेश फर्स्ट’ धोरणाची घोषणा केली आहे, ज्यामुळे युनूस सरकार आणि कट्टरपंथीयांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
  •  भारतविरोधी मानल्या जाणाऱ्या जमातच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत आता तारिक रहमान आणि बीएनपीकडे एक ‘उदारमतवादी’ पर्याय म्हणून पाहत आहे.

Tarique Rahman return to Bangladesh 2025 news : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. ‘डार्क प्रिन्स’ म्हणून ओळखले जाणारे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्याध्यक्ष तारिक रहमान (Tarique Rahman) तब्बल १७ वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. २००८ पासून लंडनमध्ये निर्वासित जीवन जगणाऱ्या तारिक यांच्या आगमनाने ढाक्याच्या रस्त्यांवर जनसागराचा पूर लोटला होता. विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत निघालेल्या रोड शोमध्ये सुमारे ५० लाख समर्थक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या शक्तीप्रदर्शनाने विद्यमान मोहम्मद युनूस सरकार आणि कट्टरपंथी शक्तींचे धाबे दणाणले आहेत.

जमातशी काडीमोड आणि ‘बांगलादेश फर्स्ट’ धोरण

तारिक रहमान यांनी बांगलादेशात पाऊल ठेवताच अत्यंत सावध पण आक्रमक राजकीय पवित्रा घेतला आहे. त्यांनी ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेसोबत निवडणूक युती करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातून प्रेरणा घेत त्यांनी “बांगलादेश फर्स्ट” ही नवी घोषणा दिली आहे. “ना दिल्ली, ना रावळपिंडी; आमच्यासाठी बांगलादेश आधी,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट केले की बीएनपी आता कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे युनूस सरकारमधील कट्टरपंथी घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

भारतासाठी ही ‘गुड न्यूज’ की धोक्याची घंटा?

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तारिक रहमान यांच्या पुनरागमनाकडे अत्यंत बारकाईने पाहिले जात आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने आणि भारतविरोधी ‘जमात’ची ताकद वाढत असल्याने, भारतासाठी बीएनपी हा आता एकमेव मोठा लोकशाही पर्याय उरला आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती, ज्याला बीएनपीने सकारात्मक प्रतिसाद दिला. ऐतिहासिक दृष्ट्या बीएनपीचे भारताशी संबंध ताणलेले असले, तरी जमातसारख्या ‘पाकिस्तान धार्जिण्या’ शक्तींना रोखण्यासाठी भारत आता तारिक रहमान यांच्याकडे आशेने पाहत आहे.

BREAKING 🇧🇩 BNP Acting Chairman Tarique Rahman is returning to Bangladesh today, ending 17 years in exile. He is en route to Dhaka and major political moment ahead.#Yunus #SheikhHasina #Elections pic.twitter.com/pXYbaQa9Ye — The Alternate Media (@AlternateMediaX) December 25, 2025

credit : social media and Twitter

कोण आहेत तारिक रहमान? ज्यांना ‘डार्क प्रिन्स’ म्हटले गेले!

माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र असलेले तारिक रहमान हे २००१ ते २००६ या काळात बांगलादेशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आणि त्यांना ‘डार्क प्रिन्स’ म्हटले गेले. २००४ च्या ढाका ग्रेनेड हल्ल्यातही त्यांचे नाव आले होते. मात्र, गेल्या वर्षी बांगलादेशच्या न्यायालयाने त्यांना अनेक प्रमुख प्रकरणांमधून निर्दोष मुक्त केले, ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस

निवडणुकीचे रणशिंग: आई आणि मुलगा मैदानात

तारिक रहमान हे त्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे बोगुरा ६ (सदर) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या मातोश्री बेगम खालिदा झिया बोगुरा ७ मधून नशीब आजमावतील. ढाका विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये जमातच्या विद्यार्थी संघटनेने मिळवलेल्या अनपेक्षित विजयानंतर, तारिक रहमान यांचे पुनरागमन बीएनपीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारे ठरेल. मात्र, वाढत्या कट्टरतावादामुळे येणाऱ्या काळात बीएनपी आणि जमात यांच्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तारिक रहमान किती वर्षांनी बांगलादेशात परतले आहेत?

    Ans: तारिक रहमान सुमारे १७ वर्षांच्या दीर्घ काळानंतर लंडनहून बांगलादेशात परतले आहेत.

  • Que: तारिक रहमान यांनी कोणती नवीन घोषणा दिली आहे?

    Ans: त्यांनी "बांगलादेश फर्स्ट" (Bangladesh First) धोरणाची घोषणा केली असून, जमात-ए-इस्लामीसोबत युती करण्यास नकार दिला आहे.

  • Que: तारिक रहमान यांचे पुनरागमन भारतासाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: वाढत्या कट्टरतावादाला आणि 'जमात'च्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत बीएनपीला एक उदारमतवादी पर्याय म्हणून पाहत असल्याने हे पुनरागमन महत्त्वाचे आहे.

Web Title: Dark prince tarique rahman returns to his homeland after 17 years see if it is hope or alarm bell for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence

संबंधित बातम्या

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?
1

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक
2

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक

Bangladesh Crisis : बांगलादेशात माध्यमांची गळचेपी; आता ‘Naznin Munni’ या पत्रकार महिलेवर कट्टरपंथीयांची टांगती तलवार,पण का?
3

Bangladesh Crisis : बांगलादेशात माध्यमांची गळचेपी; आता ‘Naznin Munni’ या पत्रकार महिलेवर कट्टरपंथीयांची टांगती तलवार,पण का?

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL
4

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.