इस्त्रायलच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू; गाझात गेल्या वर्षभरात अनेकांना गमवावा लागला जीव
जेरूसेलम: गेल्या वर्षभरापासून मध्यपूर्वेत गाझामध्ये इस्त्रायल-हमास विरोधी युद्ध सुरू आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत या युद्धादरम्यान अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये फक्त पॅलेस्टिनी नागरिकच नव्हे तर इस्त्रायलच्या बाजून लढणाऱ्या अनेक परदेशी सैनिकांचा देखील मृत्यू झाला आहे. इस्त्रायली सैन्याने हमासच्या अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहे. याला एक वर्ष उलटले असून अजूनही इस्त्रायचे हल्ले सुरूच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या अशाच कारवाईत एका भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू झाला आहे.
भारतीय वंशाच्या सैनिकाचा गाझात युद्धादरम्यान मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, हमालच्या सैनिकांनी झोलाटच्या लष्करी युनिटवर घरगुती अँटी-टँक शेलने हल्ला केला होता. या हल्ल्या दरम्यान स्टाफ सार्जंट गॅरी झोलाट आणि इतर तीन इस्त्रायलच्या संरक्षण दलाच्या सैनिकांचा मृत्यू झाला. या लष्करी कारवाईमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. इंग्रजी वृत्तपक्षाने दिलेल्या माहितीनुसार, झोलाट गाझामधील युद्धात IDF मधील ब्रिगेडच्या 92 व्या बटालियनमध्ये तैनात होते. त्यावेळी हा हल्ला झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटूंबातील आणखी दोन सदस्य देखील इस्त्रायली लष्करामध्ये शामील आहेत.
An Indian Israeli hero laid to rest 🇮🇳🇮🇱💔 Gary Zolat from the B’nei Menashe community was killed when a shell fell on him while clearing an enemy encampment in Gaza this week. He was just 21. Gary was on the verge of completing his mandatory military service. RIP Hero. pic.twitter.com/rOPWekxuDH
— Revital Moses | Moses in Israel (@RevitalMyer) November 15, 2024
ज्यू समाजाचे लोक इस्त्रायलच्या बाजूने युद्धात सहभागी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतामधील मिशोरम आणि मणिपूरचे झोलाट समुदायाचे ज्यूइस्त्रायलच्या लष्करी सैन्यात आहेत. असे म्हटले जाते की. गॅरी झोलाट हे 7 ऑक्टोबर 2023 नंतर शहीद झालेले दुसरे भारतीय वंशाचे सैनिक आहेत. याशिवाय, गेरी गिडॉन हंगल या भारतीय वंशाच्या सैनिकाचा देखील 12 सप्टेंबरमध्ये मृत्यू झाला होता. वेस्ट बॅंक गार्ड पोस्टवर तैनात असताना त्यांना ठार करण्यात आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, मणिपूर आणि मिझोराममधील ज्यू समुदायच्या अनेक तुकड्या युद्धात सहभागी झाल्या आहेत. तिबेटो-बर्मी वांशिक गटातील ज्यू हे इस्रायली जमातींचे वंशज समजले जातात. बनी मेनाशे हे देखील इस्रायलच्या 10 हरवलेल्या जमातींपैकी एक मानले जातात. त्यांना अश्शूरच्या राजांच्या काळात निर्वासित करण्यात आले होते असेम्हटले जाते.
जागतिक स्तरांवर युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरू
मध्यपूर्वेत गेल्या वर्षाभरापासून इस्त्रायलचे दहशातवादी गट हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरोधात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबंण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबण्याचे आवाहन केले असून जागतिक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी अझरबैजानमधील बाकू येथील आंतरराष्ट्रीय हवमान परिषदेत देखील युद्ध बंदीसाठी आवाहन करण्यात आले आहे.