फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बाकू: मध्यपूर्वेत गेल्या वर्षाभरापासून इस्त्रायलचे दहशातवादी गट हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरोधात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबंण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबण्याचे आवाहन केले असून जागतिक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी अझरबैजानमधील बाकू येथील आंतरराष्ट्रीय हवमान परिषदेत देखील युद्ध बंदीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
भारतासह 132 देशांनी COP युद्धविराम आवाहन केले
या युद्धामुळे देखील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा तरूणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय हवमान (COP 29) परिषदेमध्ये भारतासह 132 देशांनी COP युद्धविराम आवाहनात सामील झाल्याची घोषणा केली. यामध्ये युद्धात सहभागी देशांना परिषदेच्या महिन्यात लष्करी कारवाया थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. COP-29 हेऑलिम्पिक ट्रूसने प्रेरित असून एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत शांतता, पर्यावर संरक्षण आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक लढ्याला प्रोत्साहन दिले जाते.
मानवी साखळीद्वारे युद्धाचा निषेध
हा उपक्रम 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे सुरू करण्यात आला. यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ऑलिम्पिक खेळांदरम्यान शत्रुत्व स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. या परिषदेचे दोन मुख्य उद्दिष्टांनी आहेत. एक पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ऐक्याला प्रोत्साहन देणे. या परिषदेमध्ये मुख्य सभागृहाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून युद्धाला मूक निषेध दर्शवला. अधिकाऱ्यांनी झेंडे फडकवले तर अनेकांनी निषेधादरम्यान मौन पाळले. तसेच आंदोलकांनी हवामान समस्यांशी लढण्यासाठी अधिक निधीची मागणी देखील केली.
G-20 च्या संयुक्त राष्ट्रांना देखील आवाहन
G20 नेत्यांकडून लष्करी कारवाया थांबवण्याची अपेक्षा -या परिषदेदरम्यान G-20 देशांच्या नेत्यांना या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे हवामान प्रमुख सायमन स्टील यांनी आवाहन केले. 18 ते 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सहभागी होणार आहेत. यामुळे हवामान बदलाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी या संयुक्त राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेचे सचिव यांनी अपील केले आहे. जागतिक हवामान संकटाला प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
हल्लायांमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान
इराकच्या शिया मिलिशिया गटांनी इस्त्रायमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. त्यांनी दक्षिण इस्त्रायच्या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. तसेच पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावरही हल्ले करण्यात आले आहेत.तर इस्त्रायली सैन्य दुसरीकडे लेबनॉनमध्ये हल्ले करत आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोकांपर्यंत मानतावादी सुविधा पोहोचण्यास देखील अडथळे निर्माण होत आहे. अनेक नागरिकांपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, तसेच औषधे यांसारख्या प्राथमिक सुविधा देखील पोहचण्यास अडथळे येत आहे.