
Donald Trump again claims he stopped India Pakistan War
ट्रम्प यांनी म्हटले की, मी मोदींना म्हणालो तुम्ही अणुयुद्ध सुरु करत आहात. हे थांबवा. अन्यथा तुमच्यावर अधिक कर लावला जाईल की तुमचं डोकं गरगरायला लागेल. आतापर्यंत ट्रम्प जवळपास २० हून अधिकवेळा भारत पाकिस्तान युद्ध संपवल्याचे म्हटले आहे. पण यासाठी त्यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क (Tarrif) लादण्याची धमकी दिली होती असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प प्रशासनाचा डबल गेम! भारतावर टॅरिफ बॉम्ब पण स्वत: रशियासोबत करत आहे ‘हा’ करार
बुधवारी (२७ ऑगस्ट) व्हाइट हाऊसमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान भारताला मोठ्या प्रमणात शुल्क लादण्याची धमकी दिली होती असे म्हटले. त्यांनी सांगितले की दोन्ही देशांसोबत युद्ध संपल्याशिवाय अमेरिका व्यापार थांबवेल. ट्रम्प यांच्या मते यानंतरच दोन्ही देशांनी अवघ्या काही तासांतच युद्धबंदीचा निर्णय घेतला.
शिवाय भारत आणि पाकिस्ताने माघार घेतल्यानंतर दोन्ही देशांतील युद्धबंदीची माहिती सोशल मीडियावर जगाला दिली होती. तसेच त्यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्याचा दावा केला होता. यावर पाकिस्तानने ट्रम्प यांचे आभारही मानले होते. भारताने मात्र यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाकारला होता. तेव्हापासून आजपर्यंत ट्रम्प यांनी अनेकवेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला आहे.
सध्या ट्रम्प यांनी भारतावर ५०% शुल्क लादले असून आजपासून (२७ ऑगस्ट) १२.०१ वाजल्यापासून हे शुल्क लागू झाले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन ट्रम्प भारतावर नाराज आहेत.
ट्रम्प यांनी मोदींचे खूप चांगले व्यक्ती म्हणून कौतुकही केले. पण भारत आणि पाकिस्तान हा वाद बऱ्याच काळापासून सुरु होता, यामुळे जास्त द्वेष पाहायला मिळाला असे त्यांनी म्हटले. त्यांनी दावा केला की, सध्या वाद मिटला असला तरी, हा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे आणि तो पुन्हा सुरु झाल्यास मी पुन्हा थांबवेन असाही दावा ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला? जर्मन मासिकाचा खळबळजनक दावा