Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: आता उघड युद्ध होईल! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तालिबानवर डाफरले; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ

Pak Afg War: अफगाणिस्तानने कुनार प्रांतात पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. ख्वाजा आसिफ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अफगाण तालिबानला "खुले युद्ध" करण्याचे आव्हान दिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 12:18 PM
khawaja asif warns open war against afghanistan taliban india proxy claims

khawaja asif warns open war against afghanistan taliban india proxy claims

Follow Us
Close
Follow Us:
  • युद्धाची घोषणा
  • भारतावर आरोप
  • ऑपरेशन गजब लिल हक

Khawaja Asif statement on Afghanistan war 2026 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Pakistan Afghanistan War) यांच्यातील सीमावाद आता एका पूर्णवेळ महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गुरुवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानने कुनार प्रांतात पाकिस्तानवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ प्रचंड व्यथित झाले आहेत. या हल्ल्यात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून, ख्वाजा आसिफ यांनी आता संयंमाची सर्व मर्यादा ओलांडली असल्याचे सांगत अफगाणिस्तानला “खुले युद्ध” करण्याचे आव्हान दिले आहे.

ख्वाजा आसिफ यांचा संताप आणि भारताचे नाव

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, “पाकिस्तानचे सैन्य काही दुसऱ्या खंडातून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि आम्हाला तुमच्या मर्यादा नीट ठाऊक आहेत.” इतकेच नव्हे तर, आपली हतबलता झाकण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भारताचे नाव घेतले आहे. आसिफ यांचा दावा आहे की, अफगाण तालिबान हे ‘भारत समर्थक’ असून ते भारताच्या इशाऱ्यावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहेत. “तालिबानने अफगाणिस्तानला भारताची वसाहत बनवले आहे,” असा संतापजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak VS Afg: अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका, VIDEO VIRAL

कुनार प्रांतातील रक्तरंजित संघर्ष

गुरुवारी रात्री झालेला हा हल्ला इतका भीषण होता की पाकिस्तानी सैन्याला सावरण्याची संधीच मिळाली नाही. अफगाण सैन्याने केवळ हल्लाच केला नाही, तर २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचा आणि १९ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या आक्रमणामुळे खैबर पख्तूनख्वा सीमेवरील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले असून दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर अवजड शस्त्रसाठा सीमेवर तैनात करण्यात आला आहे.

‘Now It Is Open War Between Us And You’ Pakistan Defense Minister Says In Message To Taliban Pak Def Min Khawaja M. Asif said Islamabad’s “cup of patience has overflowed,” accusing the Taliban of turning Afghanistan into “a proxy for India” as cross-border tensions escalate. pic.twitter.com/59aUqHaNTh — RT_India (@RT_India_news) February 27, 2026

credit – social media and Twitter

‘ऑपरेशन गजब लिल हक’ आणि प्रतिहल्ला

आपल्या सैनिकांचा मृत्यू आणि चौक्या गमावल्यानंतर पाकिस्तान सरकारने ‘ऑपरेशन गजब लिल हक’ (Operation Gazab Lil Haq) नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्यांच्या दाव्यानुसार, या मोहिमेत आतापर्यंत ७२ अफगाण तालिबानी लढाऊ मारले गेले असून १२० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अफगाण सरकारने हे दावे फेटाळून लावले असून त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचा पलटवार केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

तालिबान: भारताची ‘प्रॉक्सी’ राजवट?

ख्वाजा आसिफ यांनी आपल्या विधानात म्हटले की, नाटो सैन्याच्या माघारीनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, सध्याची तालिबान राजवट भारताची ‘प्रॉक्सी’ बनली आहे. त्यांच्या मते, जगभरातील दहशतवादी अफगाणिस्तानात एकत्र येत असून तिथून ते पाकिस्तानमध्ये दहशतवाद निर्यात करत आहेत. पाकिस्तानच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा भारताला ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, ज्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ख्वाजा आसिफ यांनी भारतावर काय आरोप केले आहेत?

    Ans: ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला आहे की तालिबान हे भारत समर्थक आहेत आणि भारताने अफगाणिस्तानला आपली वसाहत बनवून तिथून पाकिस्तानविरुद्ध दहशतवाद पसरवला आहे.

  • Que: 'ऑपरेशन गजब लिल हक' म्हणजे काय?

    Ans: अफगाण हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेली ही एक लष्करी मोहीम आहे, ज्यामध्ये त्यांनी ७२ अफगाण लढाऊ मारल्याचा दावा केला आहे.

  • Que: कुनार प्रांतात नक्की काय घडले?

    Ans: गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने कुनार प्रांतात पाकिस्तानवर मोठा हल्ला केला, ज्यात ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि अनेक चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्या.

Web Title: Khawaja asif warns open war against afghanistan taliban india proxy claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • india pakistan war
  • World War 3

संबंधित बातम्या

Hormuz Strait : ‘आम्हाला जागाच आठवत नाही!’ इराणच्या ‘या’ उत्तराने अमेरिकाही चक्रावली; होर्मुझमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा
1

Hormuz Strait : ‘आम्हाला जागाच आठवत नाही!’ इराणच्या ‘या’ उत्तराने अमेरिकाही चक्रावली; होर्मुझमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य
2

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

Taiwan Strait : ‘स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांना ठेचून काढणार!’ बीजिंगमध्ये गुप्त खलबतं; तैवानचे विरोधी पक्षनेते चीनमध्ये दाखल
3

Taiwan Strait : ‘स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांना ठेचून काढणार!’ बीजिंगमध्ये गुप्त खलबतं; तैवानचे विरोधी पक्षनेते चीनमध्ये दाखल

MQ4C Triton : अमेरिकेचा 1600 कोटींचा ‘ट्रायटन’ हवेतच गायब; आखातात रोज 3 हजार कोटींचा धूर, रहस्यमय ‘सिग्नल’ने खळबळ
4

MQ4C Triton : अमेरिकेचा 1600 कोटींचा ‘ट्रायटन’ हवेतच गायब; आखातात रोज 3 हजार कोटींचा धूर, रहस्यमय ‘सिग्नल’ने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.