ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला? (Photo Credit- X)
Trump Modi Phone Calls: अमेरिका आणि भारत यांच्यातील टॅरिफ वादावरून एक धक्कादायक दावा समोर आला आहे. जर्मन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला, पण मोदींनी त्यांच्याशी बोलणे टाळले. या दाव्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
जर्मनीतील एका प्रतिष्ठित मासिकाने (FAZ) दिलेल्या वृत्तानुसार, टॅरिफच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदींशी चार वेळा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. जर ही बातमी खरी असेल, तर ट्रम्प यांच्या दबावाखाली न झुकणारे मोदी हे एकमेव जागतिक नेते ठरले आहेत. मात्र, या प्रकरणावर दोन्ही देशांच्या सरकारांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
TRUMP CALLS, MODI DOESN’T PICK UP
So far, the US President has overwhelmed all opponents in the tariff dispute. NOT INDIA.
Trump called Prime Minister Narendra Modi 4 times in the Past Few Weeks
PM didn’t Respond to Any Call by Trump 💯
Chad Priest King for a Reason 🗿🔥 pic.twitter.com/FgnDIkLka9
— Nationalist Mumbaikar 🇮🇳™ (@Ayush_Shah_25) August 26, 2025
यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे अमेरिकेच्या नेत्यांशी संवाद टाळल्याची घटना घडली होती. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या वेळी, ९ मे च्या रात्री, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीने ३-४ वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या वेळी लष्कराच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याने मोदींनी त्यांचा फोन घेतला नव्हता, असे त्यांनी लोकसभा निवडणुकीत सांगितले होते.
मोदींनी सांगितले होते की, “जेव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा उपराष्ट्रपतीने मला पाकिस्तान मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती दिली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तर आमचा हल्ला त्याहून मोठा असेल, कारण आम्ही गोळीला तोफेने उत्तर देऊ.”
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव दिसून येत आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५% टॅरिफ लावला आहे. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५% टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही देशांमध्ये टॅरिफ वादावर चर्चा सुरू असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.