Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Statement : मीच माझा कायदा! ट्रम्पने दाखवली आंतरराष्ट्रीय नियमांना केराची टोपली; मुलाखतीने जगभरात उठवले चर्चेचे वादळ

Donald Trump : ट्रम्प यांनी वादग्रस्त पावले उचलली आहेत, जसे की व्हेनेझुएलावरील कारवाई, ग्रीनलँडला जोडण्याचा पर्याय आणि इराणचा इशारा, त्यांची शक्ती केवळ त्यांच्या नैतिकता आणि निर्णयक्षमतेमुळे मर्यादित आहे असे म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 09, 2026 | 02:56 PM
donald trump controversial interview international law morality greenland taiwan 2026

donald trump controversial interview international law morality greenland taiwan 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘माझी नैतिकता हेच सर्वोच्च’
  • आंतरराष्ट्रीय कायद्यांना केराची टोपली
  • ग्रीनलँड आणि तैवानवर भाष्य

Trump New York Times interview 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी आपली सत्ता आणि आंतरराष्ट्रीय नियम यावर भाष्य करताना स्वतःला जणू ‘सर्वोच्च’ मानल्याचे दिसून येत आहे. “मला कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही, मला थांबवू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे माझी स्वतःची नैतिकता आणि माझे मन,” असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात नवा वाद पेटला आहे.

आंतरराष्ट्रीय कायदे म्हणजे केवळ ‘व्याख्या’?

जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे का? त्यावर त्यांनी अत्यंत सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, “हे तुमच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व्याख्येवर अवलंबून आहे. मी लोकांना त्रास देऊ इच्छित नाही, पण अमेरिकेच्या हितासाठी मला जे योग्य वाटेल तेच मी करेन.” याच विचारसरणीतून त्यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेला ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारांमधून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO

“मालकी हक्क ही यशाची गुरुकिल्ली”: ग्रीनलँडचा हट्ट

ट्रम्प यांनी ग्रीनलँड या डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशावर पुन्हा एकदा हक्क सांगितला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भाडेतत्त्वावर किंवा केवळ करार करून यश मिळत नाही, तर ‘मालकी’ असणे मानसिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. “मालकी तुम्हाला अशी ताकद देते जी केवळ कागदावर स्वाक्षरी करून मिळत नाही,” असे म्हणत त्यांनी ग्रीनलँड अमेरिकेचा भाग बनवण्यावर भर दिला. या विधानामुळे डेन्मार्क आणि युरोपीय देशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

NEW: 🇺🇸 Trump stated that he doesn’t need international law and he will sacrifice NATO for Greenland – New York Times Trump said in an interview with the New York Times that there are no limits to his global influence, except for his own morality. “My own morality. My mind is… pic.twitter.com/eDcig4UnpY — Megatron (@Megatron_ron) January 8, 2026

credit : social media and Twitter

तैवान आणि चीनबाबतचा ‘ट्रम्प कार्ड’

तैवानच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिलेल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला. “मी राष्ट्राध्यक्ष असताना शी जिनपिंग तैवानवर ताबा मिळवण्याचे धाडस करणार नाहीत. मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, असे झाल्यास मला ते अजिबात आवडणार नाही. कदाचित माझ्या नंतर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात चीन असे करू शकेल, पण माझ्या कार्यकाळात हे शक्य नाही,” असे ट्रम्प यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO

व्हेनेझुएला कारवाईचे समर्थन

नुकत्याच झालेल्या व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, मादुरो यांना सत्तेवरून हटवणे अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. त्यांनी दावा केला की, मादुरो ड्रग्ज कार्टेलच्या माध्यमातून अमेरिकेला धोका निर्माण करत होते. चीन आणि रशिया यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत, कारण ही अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित बाब आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याबाबत काय म्हटले?

    Ans: ट्रम्प म्हणाले की, त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही. त्यांना केवळ त्यांची स्वतःची नैतिकता आणि विचार रोखू शकतात.

  • Que: अमेरिकेने किती आंतरराष्ट्रीय संघटना सोडल्या आहेत?

    Ans: ट्रम्प यांनी अमेरिकेला तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि उप-संघटनांमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांची भूमिका काय आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँडवर अमेरिकेची 'मालकी' असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि यशासाठी आवश्यक आहे, केवळ करार पुरेसे नाहीत.

Web Title: Donald trump controversial interview international law morality greenland taiwan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

Bushfire Alert: ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘ब्लॅक समर’ची भीती! व्हिक्टोरियामध्ये 46 अंशांवर आग भडकली; चिमुकल्यासह 3 बेपत्ता, हजारो बेघर
1

Bushfire Alert: ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘ब्लॅक समर’ची भीती! व्हिक्टोरियामध्ये 46 अंशांवर आग भडकली; चिमुकल्यासह 3 बेपत्ता, हजारो बेघर

Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO
2

Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई
3

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई

Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक?  फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले
4

Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक? फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.