Will war resume Donald Trump lifts ban on arms supplies to Israel
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच अनेक खळबजनक आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बदलल्यावर माजी अध्यक्षांचे निर्णय उलथवून टाकण्याची परंपरा सुरच ठेवली आहे. ट्रम्प यांनी देखील माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या काही निर्णयांना पलटवले आहे. नुकतेच इस्त्रायलसाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब पुरवठा करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे मध्ये पूर्वेत तणाव वाढण्याची आणि संभाव्य विध्वंसाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
इस्त्रायल 2000 पाऊंड वजनाच्या बॉम्बची शिपमेंट
व्हाईट हाऊस ने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलला 2000 पाऊंड वजनाच्या बॉम्बची शिपमेंट पाठवण्याची परवानगी ट्रम्प यांनी दिली आहे. हा निर्णय माजी अध्यक्ष जो बायडेन मागील वर्षी स्थगित केला होता. बायडेन यांनी त्यावेळी 3,500 बॉम्बच्या पुरवठ्यावर तात्पुरती बंदी घातली होती. यामागचे कारण म्हणजे इस्त्रायलने मोठ्या प्रमाणात राफा शहरावर हल्ले करुन विध्वंस घडवून आणला होता. मात्र, ट्रम्प यांनी आता ही स्थगिती हटवली आहे. राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया नेटवर्क ट्रुथवर यासंबंधित एक पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, “इस्त्रायलने अनेक शस्त्रांचा साठा मागवला होता, यासाठी पैसेही आधीच दिले होते, परंतु बायडेन यांच्या निर्णयामुळे हा पुरवठा थांबवण्यात आला होता. आता मात्र ही शिपमेंट इस्त्रायलला पाठवत आहे.”
युद्धविरामाची स्थिती आणि वाढता तणाव
गेल्या काही काळात इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती. ट्रम्प यांनी स्वत: इस्त्रायल आणि हमास यांना ओलिसांच्या सुटकेसाठी आव्हान केले होते. या काराराअंतर्गत गाझातील ओलिसांची सुटका करण्यात आली होती. सध्या उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी अजूनही चर्चा सुरु आहे. दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला आहे की, उर्वरित बंधकांची मुक्तता न झाल्यास हमासविरोधात युद्ध पुन्हा सुरू करण्यात येईल. यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
इस्त्रायल आणि इजिप्तला सुट का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर विदेशी मदतीतीवर निर्बंध लादले होते. मात्र, यामध्ये इस्त्रायल आणि इजिप्तला वगळण्यात आले होते. विशेष करुन इस्त्रायल आणि इजिप्तला आपत्कालीन अन्न मदत आणि लष्करी मदत पुरवण्यात येणार होती. अमेरिकेकडून इस्त्रायलला दरवर्षी सुमारे 3.3 अब्ज डॉलर्स आणि इजिप्तला 1.3 अब्ज डॉलर्सची मदत मिळते. ही मदत तणावग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या सर्व निर्णयांमुळे मध्य पूर्वेत स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. युद्ध पुन्हा सुरू होईल की शांततेसाठी नवे मार्ग सापडतील, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीयांना अमेरिकेची भुरळ का? धक्कादायक कारणंही आलं समोर