Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव; अनेक अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप

ट्रम्प यांनी एपस्टीनच्या आरोपांबाबत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे नाकारले आहे. ट्रम्प एपस्टीनच्या लैंगिक तस्करीत सहभागी असल्याचे सूचित करणारा अद्याप कोणताही पुरावा नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 09:38 AM
एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव; अनेक अल्पवयीन मुलींचे केले लैंगिक शोषण

एपस्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव; अनेक अल्पवयीन मुलींचे केले लैंगिक शोषण

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्याय विभागाने कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित नवीन कागदपत्रे जारी केली आहेत. यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत. एफबीआयने पीडितेच्या तीन मुलाखती घेतल्या, ज्या न्याय विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार, एपस्टीनने त्या मुलीला ट्रम्प यांच्याकडे नेले होते आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी किशोरवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्यात महिलेने केलेल्या मुलाखतीत तिने आरोप केला आहे की, ट्रम्प यांनी तिला अनैसर्गिक लैंगिक कृत्यांसाठी भाग पाडले आणि जेव्हा तिने प्रतिकार केला तेव्हा ट्रम्प यांनी हिंसाचाराचा अवलंब केला. या मुलाखती अशा वेळी आल्या आहेत जेव्हा डेमोक्रॅटिक पक्ष चौकशी करत आहे की, ट्रम्पविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले कागदपत्रे लपवली आहेत का? त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीतून सत्य बाहेर येणार आहे.

अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ पर्यंतच्या फाईल्समध्ये पीडितेचे (नाव गुप्त ठेवण्यात आले) वय १३ ते १५ वर्षे असल्याचे वर्णन केले आहे. असा आरोप आहे की, एपस्टीन तिला न्यूयॉर्क किंवा न्यू जर्सी येथे घेऊन गेला, जिथे त्याने तिला एका उंच इमारतीतील प्रशस्त खोल्यांमध्ये ट्रम्पशी ओळख करून दिली. महिलेने म्हटले आहे की, ट्रम्प यांना तिचे ‘टॉमबॉय’ वर्तन आवडत नव्हते. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ट्रम्पवरही आरोप करण्यात आले होते.

ट्रम्प यांच्याकडून आरोपांचे सतत खंडन

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एपस्टीनच्या आरोपांबाबत कोणतेही चुकीचे कृत्य केल्याचे नाकारले आहे. ट्रम्प एपस्टीनच्या लैंगिक तस्करीत सहभागी असल्याचे सूचित करणारा अद्याप कोणताही पुरावा नाही. न्याय विभागाने जाहीर केलेल्या साहित्यात पुरावे किंवा संदर्भ नाहीत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे आणि पीडितेला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं गुपित बाहेर येणार?

सध्या मध्यपूर्वेत अमेरिका इराण युद्धाने (US Iran War) तीव्र पेट घेतला आहे. या युद्धामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासाठी एक धक्कादायक वृत्त आहे. एपस्टीन प्रकरणात लपलेले ट्रम्प यांचे ते गुपित अखेर बाहेर येणार आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Web Title: Donald trump name also in epstein files accused of abusing many underage girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Epstein Files
  • Jeffrey Epstein

संबंधित बातम्या

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
1

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
2

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
3

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न
4

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.