US President Donald Trump wants to make a big deal with India under tariff pressure
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात मोठा वाद सुरु आहे. दोघेही एकमेकांवर उघडपणे हल्ला करत आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दोघेही उघडपणे एकमेंकांविरोधात आक्रमक विधाने करत आहेत. यामुळे अनेक मोठ मोठ्या प्रकरणांचा खुलासा होता.
पण तुम्हाला माहित आणि ट्रम्प यांच्या मित्र त्यांचा शत्रू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ट्रम्प यांच्या अनेक मित्रांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रम्प यांनी एका मित्राला व्हाईट हाऊसमधून हाकलून लावले आहे. आता हे व्यक्ती कोण आहे हे आपण जाऊन घेणार आहोत.
मायकेल कोहेन– डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी व्यावसायिक क्षेत्रात होते. यावेळी मायकेन कोहेन त्यांचे जवळचे सहकारी मानले जायचे. कोहेन यांनी ट्रम्प यांच्यासाठी जीव देण्याचेही मोठ विधान केले होते. परंतु २०१६ मध्ये त्यांच्या मैत्रीत दरार पडली. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, न्यायालयात ट्रम्प यांनी स्वत:हा कोहेनविरोधात साक्ष दिली. यानंतर कोहेन यांनी ट्रम्प यांच्यावर फसवणुकीचा आणि खोटारडेपणाचा आरोप केला.
जॉन बोल्टन: ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात २०१८ मध्ये जॉन बोल्टन यांना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमले होते. जॉन बोल्टन यांनी त्याकाळात ट्रम्प यांच्या सर्वात जवळचे सहकारी म्हणून मानले जायचे, परंतु चीन आणि मध्यपूर्वेवर बोल्टन यांनी केलेल्या विधानामुळे ट्रम्प संतापले. नंतर त्यांनी २०१९ मध्ये बोल्ट यांना प्रशानातून काढून टाकले. सध्या बोल्टन ट्रम्प कट्टर विरोधक मानले जातात.
रेक्स टिलरसन– २०१६ मध्ये ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. यावेळी त्यांनी रेक्स टिलरसन यांना प्रशासनात परराष्ट्र मंत्रीपद सोपवले होते. परंतु त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संबंध बिघडले. टिलरसन यांनी ट्रम्प यांचे ‘मूर्ख ट्रम्प’ असे वर्णन केले होते. तसेच त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराबाबतही ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मार्क मिले– टिलरसन यांच्याप्रमाणेच ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांचे विश्वासू मार्क मिले यांच्यावर मोठी जबादारी सोपवली होती. मार्क मिले यांची प्रमुख लष्करपदी निवड ट्रम्प यांनी केली होती. पकंतु २०२० मध्ये ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाला. यावेळी मार्क यांनी पद सोडण्यास ट्रम्प यांना नकार दिला. यामुळे ट्रम्प यांनी मार्क मिलेपासून स्वत:ला दूर ठेवले. मिले यांनी ट्रम्पवर हुकूमशाहीच्या मार्गाचा वापर करत असल्याचा आरोप केला होता.
मॅनिगॉल्ट न्यूमन– मॅनिगॉल्ट न्यूमन हे एक अमेरिकन टिव्ही स्टार आहेत. २००३ मध्ये ट्रम्प यांच्याशी त्यांची मैत्री झाली. दोघांमधील मैत्री अगदी जय-विरु सारखी मानली जात होती. २०१५ मध्ये मस्क यांच्या प्रमाणेच न्यूमन यांनीही ट्रम्प यांना उघड पाठिंबा दिला होता. तसेच राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मस्क यांच्याप्रमाणेच त्यांनाही व्हाईट हाऊसमध्ये सुरक्षा सल्लागाराची जबाबदारी सोपवली होती. परंतु २०१७ मध्ये ट्रम्प आणि न्यूमन यांच्यात मोठा वाद झाला. नंतर ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर काढले.
सध्याही मित्रांशी वाद घालण्याची ही परंपरा ट्रम्प यांनी सुरुच ठेवली आहे.