Elon Musk-Donald Trump Controversy: एलॉन मस्क बनवणार स्वतःचा नवा पक्ष? दिली मोठी धमकी, नासालाही बसणार फटका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीत मोठी दरार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद मस्क यांच्या वन बिग ब्युटीफूल या ट्रम्प यांच्या विधेयकावर टीका केल्यानंतर हा वाद प्रचंड वाढला आहे. दरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. टेस्लाचे सीईओ नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे.
याची सुरुवात मस्क यांच्या जवळचे मित्र जेरेड आयजॅकमन यांना नासाच्या प्रमुख पदाच्या नामांकनातून हटवण्यात आल्यानंतर झाली. ट्रम्प यांनी आयझॅकमन यांचे नाव अचानक मागे घेतल्याने मोठी खळबळ उडाली. मस्क यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
तसेच एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन विग ब्युटीफुल कायद्यावरी टीका केली. यामुळे त्यांनी DOGE विभागाचा राजीनामा दिला. मस्क यांनी बिग बिल ब्युटीफुलचा उल्लेख बिग अग्ली बिल म्हणून केला. त्यांनी म्हटले की, यामुळे अमेरिकेची तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. या बिलाला मस्क यांनी घृणास्पद म्हटले आहे.
पण ट्रम्प यांच्या मते, वन बिग ब्युटीफुल बिल हे अमेरिकेच्या ऐतिहासिक कर कपात आणि ‘मेक द अमेरिका ग्रेट अगेन’ मोहीमेाठी आवश्यक आहे. यामुळे ट्रम्प यांची टीका डोनाल्ड ट्रम्प यांच्या धो ‘मेक द अमेरिका ग्रेट अगेन’ आणि कर कपातीला विरोध करणारी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी यांनी इलॉन मस्कच्या सरकारी सबसिडी आणि कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याबाबत एक्स पोस्ट केली होती. ट्रम्प यांचे हे विधान मस्कवर थेट आर्थिक हल्ला करणारे होते. यावर मस्कने एक्सवर “ट्रम्प यांनी दिलेली धमकी पाहता, स्पेस एक्स तातडीने ड्रॅगन स्पेसक्राफ्टची सेवा रद्द करत आहे” असे म्हटले होते.
तसेच मस्क यांनी आणखी एक हल्ला करत एपस्टाईल फाइलशी संबंधित माहिती उघड करणार असल्याचे म्हटले. त्यांनी एक्सवर लिहिले की, मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईच्या फायलींमध्ये आहे. यामुळेच या फाईल्स सार्वजनिक केल्या जात नाहीत.
मस्क यांच्या या विधानानंतर अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली होती. एपस्टाईन ही फाईल लैंगिक गुन्ह्यांशी संबंध असलेल्या हाय-प्रोफाइल लोकांची आहे.
सध्या मस्क-ट्रम्प हा वाद चर्चेत आहे. याच वेळी मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या कल्पनेवर लोकांचे मत विचारले आहे. त्यांनी एक्सवर अमेरिकेत मध्यवर्ती (८०%) लोकांचे प्रतिनिधीत्व करणारा एक नवीन राकीय पक्ष निर्माण करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यावरुन मस्क आता राजकारणात येण्याची तयारी करत असल्याचे दिसून येते आहे.
Is it time to create a new political party in America that actually represents the 80% in the middle?
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
सध्या ट्रम्प स्पेसएक्, टेस्ला सारक्या कंपन्यांचे सरकारी करार रद्द करण्याचा विचार करत आहेत. यामुळे मस्क यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.जागतिक