
Trump on Jeffrey Epstein
ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना इशारा दिला की, ते जेफ्रीसोबत अनेक वर्षांपूर्वी केवळ सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. मात्र आता त्यांच्यावर आणि जेफ्रीला भेटलेल्या लोकांवर विनाकारण संशय घेतला जात आहे. यामुळे प्रतिष्ठित बँकर्स, वकिल, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजकीय प्रतिमा खराब होत आहे. त्यांनी दावा केला आहे की, या प्रकरणाशी संबंधित फाइल्स सार्वजनिक करुन न्याय विभागा रिपब्लिकनच्या यशारवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
काही दिवसांरपूर्वी अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे जेफ्री सोबतचे काही फोटो अमेरिकेच्या न्यायविभागाने सार्वजनिक केले होते. या फोटोंमुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या फोटोंवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी म्हटले की, ‘बिल क्लिंटन माझ्या आवडीचे आहेत. आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांचे जेफ्रीसोबतचे फोटो पाहून वाईट वाटते.’ पण याच वेळी ट्रम्प यांनी असाही दावा केला की, मी देखील त्या पार्टीत होतो, जेफ्री एपस्टीन अशा अनेक कार्यक्रमांमध्ये असायाचा. पण म्हणून त्याच्यासोबत फोटोत, पार्टीत दिसणं गुन्हा ठरत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्याय विभागावर अशा पद्धतीने फोटो सार्वजिनत करण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एखाद्या पार्टीत काढलेला फोटो आज एखाद्याची आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो. हे भयानक आहे. बिल क्लिंटनसारखे मोठे लोक याचा सामना करु शकती. परंतु निरापराध लोकांवर याचा परिणाम होईल असे ट्रम्प यांनी म्हटले.
विशेष म्हणजे जेफ्री एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्यावर महिला आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आणि मानवी तस्करीचे आरोप होते. अधिकृतपणे त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे, पण आजही या प्रकरणात त्याची हत्या झाल्याचे संशय व्यक्त केले जात आहे.
Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला