Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Epstein Files : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एपस्टिन फाईल्सवरुन केंद्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 12:40 PM
MP Sanjay Raut Press conference target dcm eknath shinde marathi news

MP Sanjay Raut Press conference target dcm eknath shinde marathi news

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत पत्रकार परिषद
  • एपस्टिन फाइल्समध्ये मोदी सरकारमधील नेत्यांचे नाव असल्याचा दावा
  • पंतप्रधानांनी कारवाई करण्याची मागणी
Sanjay Raut on Epstein Files : मुंबई : संपूर्ण विश्वामध्ये सध्या एपस्टीन फाइल्सने धुमाकूळ घातला आहे. एपस्टीन फाइल्समध्ये जगातील अनेक प्रसिद्ध राजकारणी, बिझनेसमॅन आणि लोकप्रिय व्यक्तींची नावे आल्यामुळे गदारोळ निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये यावरुन मोठा राडा झाला असून ब्रिटनचे पंतप्रधानांचे स्थान धोक्यात आले आहे. याच एपस्टिन (Jeffrey Epstein) फाईलवरुन भारतामध्ये देखील राजकारण तापले आहे. या फाईमध्ये सत्ताधारी मंत्र्यांची नावे असल्याचा दावा विरोधक करत आहेत. त्यांवर आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील दुजोरा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आपण एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार या सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का?” असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; AAP नेत्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

खासदार राऊत पुढे म्हणाले की, “या एपस्टीन फाइल्सवर मी आता अधिक काही बोलणार नाही. कारण यावर बोलायला आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सक्षम आहेत. मात्र पंतप्रधान मोदींनी त्या नावं येणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? बिल गेट्स यांच्या पत्नीला याबद्दल कळलं तेव्हा तिने नवऱ्याशी घटस्फोट घेतला. त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या मंत्र्यांवर झालेलं असताना ते अजूनही आपल्या देशावर कारभार करत आहेत. हा यातील फरक समजून घ्या,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान

तर ते अत्यंत बकवास आहे

त्याचबरोबर सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. संसदेमध्ये गदारोळ झाल्यानंतर पंतप्रधान मोदींवर काँग्रेस महिला खासदार आक्रमक भूमिका घेतील अशी भीती लोकसभा स्पीकर ओम बिरला यांनी व्यक्त केली. यावरुन आता जोरदार टीका केली जात आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “हे बकवास आहे. मोदींच्या आधीपासून आम्ही संसदेत आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला संसद आणि त्याचे कामकाज माहित आहे. संसदेची आचारसंहिता आणि नियम माहीत आहे. मोदींना कोणापासून धोका आहे? काँग्रेसपासून? ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात मोठं योगदान दिलं, तुरुंगवास भोगला, त्यातूनच ही पार्लमेंट तयार झाली. त्या काँग्रेसपासून मोदींना धोका आहे, असं म्हटलं जात असेल तर ते अत्यंत बकवास आहे,” अशी टीका खासदार राऊतांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut live news on epstein file indian name in modi government political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Jeffrey Epstein
  • Modi government
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.