Donald Trump on TikTok Ban says, Depends on China
Donald Trump on TikTok Ban : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनच्या टिकटॉरवरील बंदीवर एक खळबळजनक विधान केले आहे. न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी सुरु असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी चीनवरच्या टिकटॉकवरील बंदीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ट्रम्प यांनी टीकटॉकवरील बंदी हटवली जाईल का नाही हे स्पष्ट नसल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी सांगितले की, आता याचा निर्णय चीनवर अवलंबून आहे. पण चीनशी सुरु असलेल्या चर्चेवरुन मुदतीत वाढ होण्याची शक्यत कमी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, चीनला टीकटॉकसाठी देण्यात आलेली मुदत १७ सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. यापूर्वी ही मुदत तीन वेळा वाढवण्यात आली होती. सुरुवतीला जानेवारी २०२५ मध्ये नंतर एप्रिल मध्ये आणि नंतर जूनमध्ये टीकटॉकवरील बंदीच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली होती.
अमेरिकेने टीकटॉकची कंपनी बाईटडान्सला जानेवारी २०२५ मध्ये कंपनीतील अमेरिकेचे शेअर्स विकून किंवा प्लॅटफॉर्म बंदी करण्यास सांगण्यात आले होते. सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन काँग्रेसने TikTok वर बंदी घालणारा कायदा मंजूर केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एप्रिल 2024 मध्ये या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.
१९ जानेवारीपर्यंत यावर बंदी घालण्यात आली होती. सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. पण ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी अंतिम मुदतीत तीन वेळा वाढ केली. यासाठी एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला होता, जो नंतर जून, मग सप्टेंबर पर्यंत वाढला.
दरम्यान आता टीकटॉवरील बंदीची अंतिम मुदत ही १७ सप्टेंबपर्यंत असून यामध्ये वाढ होणार नसल्याचे ट्रम्प यांच्या विधानावरुन स्पष्ट होते. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे टीकटॉक अमेरिकेला विकले गेले नाही तर त्यावर अमेरिकेत पूर्णपणे बंदी लागू करण्यात येईल. याअंतर्गत अमेरिकेत लोकांच्या फोनमधून टीकटॉक पूर्णपण काढून टाकले जाईल. मात्र यावर अद्याप चीनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
FAQs (संबंधित प्रश्न)
अमेरिकेने टीकटॉकवर बंदी का घातली होती?
अमेरिकेच्या मते, TikTok मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती आहे. अमेरिकेच्या मते, चीनी सरकार TikTok च्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांवर नजर ठेवू शकते यामुळे हा टीकटॉकवर बंदी लागू करण्यात आली होती.
कोणी लागू केली होती टीकटॉकवर बंदी ?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी टीकटॉवर बंदी घातली होती. ही बंदी नतंर ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर हटवली आणि यासाठी अंतिम मुदत चीनला देण्यात आली.
कधीपर्यंत होती टीकटॉवरील बंदीची अंतिम मुदत?
सुरुवातीला बायडेन यांनी १९ जानेवारी पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. यानंतर यामध्ये ९० दिवसांची वाढ झाली आाणि ही मुदत जूनपर्यंत पोहोचली आणि पुन्हा यात वाढ करण्यात आली, जी १७ सप्टेंबरला समाप्त होणार आहे.