China News in Marathi : बीजिंग : चिनी शास्त्रज्ञ कधी कशाचा शोध लावतील सांगणे कठीण आहे. कधी कृत्रिम सूर्य तयार करती, तर कधी जीवन देणारा रोबोट तयार करतील,तर कधी हवेत तरंगणाऱ्या गाड्या तयार करतील. चीनचे विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रयोग यामुळे सतत चर्तेत येते असतात. आता चीनी शास्त्रज्ञांनी असा एक शोध लावला आहे जो मानवी जीवनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. चिनी शास्त्रज्ञांनी मानवी हाडांना जोडणारा ग्लूचा शोध लावला आहे. यामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.
चिनी शास्त्रज्ञांचा अनोखा शोध
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व चीनमधील झेजियांद प्रांतातील सर रन रन शॉ हॉस्पिटलचे चीफ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.लिन जियानफेंग आणि त्यांच्या टीमने मानवी हाडांना जोडण्यासाठी ग्लू तयार केला आहे.या ग्यूचे नाव बोन-२ ठेवण्यात आले असून दावा केला जात आहे की, यामुळे केवळ २ ते ३ मिनिटांत तुमची हाडे जोडली जाऊ शकतात. या संशोधनाने जगभर खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये १५० वर्षांपर्यंत मानवाला जिवंत ठेवता येते अशी गुप्त चर्चा झाली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि धुमाकूळ उडाला होता.
१५० हून अधिक चाचण्या यशस्वी
चिनी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्लू शरीरामध्ये रक्तस्त्राव सुरु असतानाही हाडांना मजबूतीने जोडतो. तसेत हा ग्लू पूर्णपणे बायोसेफ आहे, यामुळे शरीरावर इतर कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्याही प्रकारची इजा किंवा अपाय होणार नाही. या ग्लूची काम करण्याची क्षमता अधिक जास्त आहे.आतापर्यंत १५० हून अधिक जास्त वेळा या ग्लूची रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.
सध्या एखादे हाड तुटल्यास त्यामध्ये स्टीलचा रॉड्स आणि स्क्रू घालावा लागतो, ज्यासाठी हाडांमध्ये मोठी चिर करावी लागले. तसेच ऑपरेशननंतर संसर्गाचा धोका अधिक अशते. दुसरी शस्त्रक्रियाही करावी लागते. मात्र या ग्लूमुळे केवळ सहा महिन्यात हाडे जोडली जातील. शिवाय ग्लू पूर्णपणे शरीरातच विरघळून जाईल. यामुळे पुन्हा ऑपरेशनची गरज भासणार नाही.
कुठून आली कल्पना?
शास्त्रज्ञ डॉ. लिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना असा ग्लू तयार करण्याची प्रेरण समुद्रातील शिंपल्यांमधून मिळाली. शिंपले समुद्रातील खडकांवर घट्ट चिटकून राहतात. तसेच पाण्याखाली विशेष चिकट द्रव तयार करतात. यामुळे रक्तामध्य देखील असे करता येईल. या संशोधनाची सुरुवात त्यांना २०१६ पासून सुरु केली होती. दरवर्षी लाखो लोकांना हाड तुटण्याची समस्या उद्भवत असतात. तसेच यासाठी लागणारी ट्रीटमेंट ही अत्यंम महागडी आणि वेदनीय असते. यामुळे Bone-2चा शोध ऑर्थोपेडिक शास्त्रासाठी क्रांतीकारी ठरु शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
चिनी शास्त्रज्ञांना कशाचा शोध लावला?
चिनी शास्त्रज्ञांनी हाडे तुटल्यानंतर ती जोडण्यासाठी बोन ग्लूचा शोध लावला आहे.
कोणी लावला बोन ग्लू चा शोध?
चीनमधील झेजियांद प्रांतातील सर रन रन शॉ हॉस्पिटलचे चीफ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.लिन जियानफेंग आणि त्यांच्या टीमने मानवी हाडांना जोडण्यासाठी बोन ग्लूचा शोध लावला आहे.