Donald Trump Posts AI Video showing Barack Obama's Arrest by FBI
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेचा विषय बनत असतात. २०२५ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात ट्रम्प त्यांच्या अनेक वादग्रस्त विधांनामुळे चर्चेत राहिले आहेत. नुकतेच टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी सोशल मीडियावर ट्रम्प यांचा जोरदार वाद झाला होता.
यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी वादावरुन देखील ते जगभर चर्चेत राहिले होते. दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी जगभर गोंधळ उडवला आहे. यावेळी ट्रम्प यांनी एक वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना टार्गेट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दृश्य दिसत आहे. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एफबीआयकडून अटक केल्याचे दिसत आहेत. त्यांना हातकडी घालण्यात आली आहे. तसेच ट्रम्प यांच्यासमोर जमिनीवर बसवण्यात आले आहेत. त्यांची कॉलर पकडल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचे मानले जात आहे. मात्र याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
या व्हिडिओच्या सुरुवातील ओबामा यांनी “राष्ट्रपतींना विशेष अधिकार आहेत आणि ते कायद्याच्या वर आहेत” असे म्हटले आहे. यानंतर या व्हिडिओमध्ये माजी अध्यक्ष बायाडेन यांच्यासह अनेक अमेरिकेन नेत्यांच्या क्लिप्स यामध्ये दाखवण्यात आले आहेत. तसेच कायद्याच्या वर कोणीही नाही असे व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ज यांनी ओबामा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी ओबामा प्रशासनाने २०१६ च्या निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या दाव्याने जगभर खळबळ उडाली होती. दरम्यान या दाव्यानंतरच ट्रम्प यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीची देखील मागणी करण्यात आले आहे.
हा व्हिडिओ डीफेक तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवण्यात आला असल्याचे सांगतिले जात आहे. एआय आधारित डीफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने असे व्हिडिओ तयार केले जातता, जे अगदी खरे असल्याचासरखे दिसतात. यापूर्वी देखील असे अनेक सेलिब्रेटींचे बनावटी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पसरवण्यात आले आहेत.