ट्रम्प यांची प्रतिमा मलीन करण्याचा ओबामा प्रशासनाने रचला होता कट; तुलसी गबर्डचा खळबळजनक दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर ट्रम्प यांना सत्तेवरुन हटवण्याच्या कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या माजी कॉंग्रेसवुमन आणि राष्ट्रवादी नेत्या तुलसी गबार्ड यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्याने अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी बराक ओबामा आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरिोधात सखोल चौकशीची मागणी केली आहे.
गबार्ड यांनी म्हटले आहे की, बराक ओबामा आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना पदावरुन हटवण्यासाठी कारवाई केली होती. त्यांनी सोशल मीडिया मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, “ओबामा यांचा हेतू ट्रम्प यांना पदावरुन काढण्याचा होता, तसेच अमेरिकेच्या जनतेच्या निर्णयाला पायदळी तुडवण्याचा होता. यामुळे या कटात सामील असलेल्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी तुलसी गबार्ड यांनी केली आहे.
शुक्रवारी (१८ जुलै) राष्ट्रीय गुप्तचर संचालकाच्या (National Intelligence Director) ने या प्रकरणासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तुलसी गबार्ड याच्या संचालक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात विजय मिळवला होता. या विजयानंतर ओबामा प्रशासनाने ट्रम्प विरोधात खोटी गुप्तर माहिती तयार होती. याचा राजनैतिकदृष्ट्या गैरवापर करण्यात आला.
Their goal was to usurp President Trump and subvert the will of the American people. No matter how powerful, every person involved in this conspiracy must be investigated and prosecuted to the fullest extent of the law. The integrity of our democratic republic depends on it. We… pic.twitter.com/KJ7qrmMv0k — DNI Tulsi Gabbard (@DNIGabbard) July 18, 2025
याशिवाय बराक ओबामा यांनी डिसेंबर २०१६ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक उच्चस्तरीय बैठकीकही आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य जेम्स, क्लॅपर, सुसान राईस, जॉन ब्रेनन, डॉन केरी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी एका ईमेलद्वारे ओबामांच्या सुचनेनुसार, खोटे गुप्तचर अहवाल तयार केले होते. यामध्ये रशियन निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी उपायांचा आढावा घेण्यात आला होता.
तुलसी गबार्ड यांनी या संपूर्ण गुप्तचर अहवालाचा ट्रम्प यांच्याविरोधात तपास, महाभियोद आणि माध्यमातून त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी करण्यात आला होता असे सांगितले. हा प्रकार अमेरिकन लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हणज त्यांनी संबंधित व्यक्तींविरोधात कारवाईची देखील मागणी त्यांनी केली.