Donald Trump thanks Pakistan President Shehbaz Sharif, know detail
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफच्या निर्णयावरुन चर्चाचा विषय बनत आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत अमेरिकेन कॉंग्रेसच्या त्यांच्या पहिल्या भाषणात भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादून मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अमेरिकेचे या देशांसोबत व्यापर युद्ध सुरु झाले आहे. मात्र दुसरीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहे. एककीकडे मित्र देश शत्रू बनला आहे, तर दुसरीकडे शत्रू देशाला अमेरिका जवळ करत आहे.
पाकिस्तानने दहशतवाद्याला अटक करण्यास अमेरिकेला केली मदत
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने एका दहशतवाद्याला अटक करण्यास मदत केल्याने त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, अमेरिका नेहमीच कट्टपंथी इस्मामिक दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभा राहिल.
2021 मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परतले होते, त्यावेळी विमानतळावर एक आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे 13 सैनिक मारले गेले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताला झटका! डोनाल्ड ट्रम्प एप्रिलपासून लागू करणार ‘हा’ मोठा निर्णय
काय म्हणाले ट्रम्प?
यावरुन ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेरले आणि हा तिथून परत येण्याचा मार्ग होता का असे म्हटले. त्यानंतर त्यांनी तो दिवस अमेरिकेत्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद दिवस असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, मात्र आता मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, त्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे, त्या दहशतवाद्याला कायद्याला सामोरे जावे लागेल.
दरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानताना म्हटले की, “त्या निर्दयी गुन्हेरागाला पकडण्यास मदत केल्याबदल्ल मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो. तसेच हा क्षण शहीद झालेल्या 13 सैनिकांच्या कुटूंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे.
अनेक देशांवर टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले आहे की, अमेरिका 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल, याचा उद्देश जो देश आमच्यावर जेवढा टॅक्स लावेल तितकाच टॅक्स त्यांच्यावर लावण्यात येईल. यामध्ये त्यांनी भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा उल्लेख त्यांनी केला. ट्रम्प यांनी म्हटले की, हे देश अमेरिकेवर जास्त कर लागू करतात, यामुळे आम्ही देखील तितकाच कर लागू करु.
जागतिक स्तरावर परिणाम
मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे व्यापर युद्ध सुरु झाले असून याचा जागतिक अर्थव्यवस्थवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या व्यापर युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्ळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढून महागाई वाढेल. केवळ कृषी क्षेत्रच नव्हे तर उत्पादन, तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. या व्यापर युद्धामुळे जागतिक आर्थिक मंदीचाही धोका वाढू शकतो.