भारताला झटका! डोनाल्ड ट्रम्प एप्रिलपासून लागू करणार 'हा' मोठा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफच्या निर्णयावरुन चर्चाचा विषय बवत आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोे वर 25 टक्के कर तर चीनवर 20 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी भारतालाही मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले आहे की, अमेरिका 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल, याचा उद्देश जो देशा आमच्यावर जेवढा टॅक्स लावेल तितकाच टॅक्स त्यांच्यावर लावण्यात येईल. यामध्ये त्यांनी भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा उल्लेख त्यांनी केला. ट्रम्प यांनी म्हटले की, हे देश अमेरिकेवर जास्त कर लागू करतात, यामुळे आम्ही देखील तितकाच कर लागू करु.
व्यापार न्यायपूर्वक आणि संतुलित करण्याचा उद्देश
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत काही अमेरिकन उत्पादनांवर 100% पेक्षा जास्त कर लादतो. यामुळे अमेरिकन उत्पादकांना अडचणी येतात. त्यांनी नमूद केले की, दोन्ही देशांत व्यापर अधिक न्यायपूर्वक आणि संतुलित करण्यासाठी अमेरिका 2 एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी यावर एक विनोदी टीका देखील केली. त्यांनी म्हटले की, खरंतरं मला 1 एप्रिल पासून सुरु करायचे होते. पण जगाने समजू नये की, मी एप्रिल फूल डे साजरा करतोय. यामुळे मी, 2 एप्रिलपासून परस्पर कर लागू करणार आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेवर कर लादणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा भारत आणि चीन, कॅनडाचा कराचा उल्लेख केला आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होणार?
भारतीय आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयाचा काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: कृषी आणि वाहतूक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे GDP वाढीची शक्यता आहे, तसेच वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकतो, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, शेअर मार्केटमध्ये देखील अस्थिरता निर्माण होईल आणि गुंतवणूकगारांच्या चिंता वाढेल.
या परिस्थिती भारताने अमेरिकेसोबत व्यापार संबंध सुरळित करण्यासाठी काही महत्त्वाची पाऊले उचलायला सुरवात केली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताच्या काही क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रांवर कर लादल्यास या क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यात आहे, यामुळे रोजगार आणि उद्योगाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यात आहे. आता देशाचे आर्थिक संतुलन राखले जाईल की त्यावर नकारात्मक परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.