
Donald Trump to meet Zoharan Mamdani on 21 November in White house
Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प शुक्रवारी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी व्हाईट हाउसमध्ये ममदानी यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहे, अशा परिस्थिती ही बैठक कशी पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे आणि मुस्लिम समाजातील एक नेते आहे. त्यांना न्यूयॉर्कच्या (Newyork) महापौरपदी निवडण्यात आले आहे. ख्रिश्चन बहुसंख्यिकी शहराने त्यांना निवडून दिले आहेत. हा त्यांच्याचासाठी मोठा विजय आहे. त्यांनी न्यूयॉर्कचे माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला होता. कारण ममदानी ट्रम्प यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी ममदानी यांच्यावर तीव्र टीकाही केली होती. ममदानी यांच्या धोरणांवर आणि त्यांना कम्युनिस्ट मेयर असेही म्हटले होते. परंतु सध्या ट्रम्प यांनी ममदानी यांच्याकडे भेटीचा प्रस्ताव मांडला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, यासाठी न्यूयॉर्कबद्दलचे माझे प्रेम कारणीभूत आहे. त्यांच्यासाठी मला मतभेद विसरावे लागतील. यामुळे मी ममदानी यांना भेटण्यास तयार आहे. ट्रम्प यांनी निवडणूपूर्वी ममदानी विजयी झाले तर न्यूयॉर्कला आर्थिक आणि सामाजिक निधी दिला जाणार नाही, अशी धमकी दिली होती. परंतु आता ट्रम्प सूर बदलताना दिसत आहेत.
दुसरीकडे ममदानी यांनी देखील ट्रम्पवर हल्ला चढवला होता. त्यांनी ट्रम्प यांना तानाशाह संबोधत, न्यूयॉर्क त्यांच्या नेतृत्तावाखील अधिक बळकट होईल असे म्हटले होते. ममदानी यांनी असेही विधान केले होते की, ट्रम्पसारख्या लोकांना रोखण्यासाठी सर्वोत्त मार्ग म्हणजे ते फायदा घेत असलेल्या परिस्थितींचा अंत करणे आहे. ममदानी यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली होती.
या विधानावर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. परंतु ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदी येत अमेरिकेत इतिहास रचला आहे. ते अमेरिकेतील भारतीय वंशांचे पहिले मुस्लिम महापौर ठरले आहे. सध्या ट्रम्प आणि ममदानी यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून अमेरिकन राजकारणात कोणते नवे वळण येईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प आणि जोहरान ममदानी व्हाईट हाऊसमध्ये २१ नोव्हेंबर रोजी भेट घेणार आहेत.
Ans: न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणूकीपूर्वी ट्रम्प यांनी ममदानींच्या धोरणांवर टीका केली होती. त्यांच्या धोरणांना ट्रम्प यांना आर्थिक आणि सामाजिक आपत्ती म्हटले होते.
Ans: जोहरान ममदानी हे भारतीय वंशाचे आणि मुस्लिम समाजातील एक नेते आहे. ते अमेरिकेतील भारतीय वंशांचे पहिले मुस्लिम महापौर ठरले आहेत.