
US Iran War
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गॅंग ऑफ ८ या गुप्तचर समितीला गोपनीय ब्रिफींग दिले आहे. या ब्रिफींगमुळे इराणवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्याची शक्यता अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सर्वात घातक F-22 रॅप्टर स्टेल्थ फायटर जेट्स इस्रायलमधील ओवाडा एअरबेसवर दाखल झाले आहे. तर दुसरीकडे डिएगो गार्सिया बेटावरही F-16 विमानांचा ताफा आणि रिफ्यूलिंग टॅंकर्स पाठवण्यात आले आहेत. इराणची पूर्णपणे तटबंदी करण्याचा याचा हेतू आहे.
Intersting choice. USAF F-22 fighter jets redeployed from the UK will be stationed at the Ovda Air Base in southern Israel, per reports. H/t to @EISNspotter as I believe that he broke the news first. At this moment, we know about the redeployment of 11 F-22s (one from the… https://t.co/v1MKiiDXHr pic.twitter.com/4KOFvJl6yd — Status-6 (War & Military News) (@Archer83Able) February 24, 2026
गॅंग ऑफ ब्रीफींग अत्यंत गंभीर माानले जाते. नुकतेच मार्को रुबियो यांनी दिलेल्या ब्रीफींगनंतर सीनेट मायनॉरिटीने परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. काही प्रतिनिधींनी युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. जिनेव्हामध्ये आज होणाऱ्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय लागल नाही तर इराणवर हल्ला होण्याची शक्यता आहे. सध्या इराणला चारी बाजूंनीह घेरले जात असून अमेरिकेचे सर्वात धोकादायत एअर क्राफ्ट यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड देखील भूमध्य समुद्रात दाखल झाले आहे. सध्या इराण आपला अणु कार्यक्रम बंद करण्याचे मान्य करतो का नाही, यावर युद्धाचा निर्णय टिकून आहे.
PRESIDENT TRUMP on IRAN: My preference is to solve this problem through diplomacy, but one thing is certain: I will NEVER allow the world’s number one sponsor of terror to have a nuclear weapon. We have to be strong. It’s called peace through strength. pic.twitter.com/0CPKHtvQDt — Department of State (@StateDept) February 25, 2026
Ans: गॅंग ऑफ ८ चे ब्रिफींग अत्यंत धोकदायक मानले जात असून ही अमेरिकन कॉंग्रसमधील आठ वरिष्ठ आणि गोपनीय नेत्यांची एक टीम आहे. या टीमला अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील इंटेलिजेंस माहिती पुरवली जाते. यानंतर संबंधित देशावर लष्करी कारवाईची शक्यता अधिक असते.
Ans: इराणच्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेला बंदी घालायची आहे, परंतु इराणने यासाठी नकार दिला असल्याने दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढला आहे.