Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vatican News :पोप लिओ चौदावेंचा ऐतिहासिक विक्रम :अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करणारे पहिले पोप ठरले

Vatican News : पोप लिओ चौदावे यांनी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत टपालाद्वारे मतदान करून इतिहास रचला आहे. अमेरिकेचे नागरिकत्व कायम असलेल्या पोपांनी शिकागो येथे आपले मत नोंदवले. मतदान हा नागरिकांचा अधिकार आणि कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 30, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शिकागोहून टपालाद्वारे मतदान
  • लोकशाही प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मत
  • ३ नोव्हेंबरला अमेरिकेत मध्यावधी निवडणूक
Vatican News : जगभरातील कॅथलिक धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ चौदावे यांनी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान करून इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करणारे ते पहिले पोप ठरले आहेत. व्हॅटिकनमध्ये वास्तव्यास असूनही त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व कायम ठेवले असून, टपालाद्वारे आपले मत नोंदवले आहे. त्यांच्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

पोप लिओ चौदावे यांचे मूळ नाव रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे झाला. २०२५ मध्ये पोपपदी निवड झाल्यानंतर ते व्हॅटिकनमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा त्यांचा अधिकार कायम आहे.

China News : चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव

शिकागोहून टपालाद्वारे मतदान

पोप लिओ यांची अमेरिकेतील इलिनॉय राज्याच्या विल काउंटीमध्ये मतदार म्हणून नोंदणी आहे. त्यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीसाठी ३ ऑक्टोबर रोजी टपालाद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी आपले मत नोंदवून मतपत्रिका शिकागो येथे पाठवली. व्हॅटिकनच्या प्रेस कार्यालयाने ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदानाला अधिकृत दुजोरा दिला.

लोकशाही प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मत

पोप लिओ चौदावे यांनी नागरिकांच्या लोकशाही प्रक्रियेतील सहभागाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. मतदान करणे हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अधिकार असून, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे त्याचे कर्तव्यही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पेरूमध्ये वास्तव्यास असतानाही पात्र असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा अधिकार बजावल्याचे व्हॅटिकनने सांगितले.

US Military : 3 पॉलीग्राफ चाचण्यांत नापास! अमेरिकन जनरलची हकालपट्टी, इरान-युक्रेन युद्धाची माहिती लीक केल्याचा आरोप

३ नोव्हेंबरला अमेरिकेत मध्यावधी निवडणूक

अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी, तर सिनेटच्या ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय ३६ राज्यांमध्ये गव्हर्नरपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा महत्त्वाच्या निवडणुकीत पोप लिओ चौदावे यांनी मतदानाचा अधिकार बजावल्याने त्यांच्या सहभागाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Pope leo xiv first pope votes us midterm election 2026 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • America news
  • Marathi News
  • Voting Card

संबंधित बातम्या

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच
1

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर
2

PM Modi News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदींचा निर्धार! विज्ञान-तंत्रज्ञानासह शेतीच्या सर्वांगीण विकासावर भर

Shraddha Kapoor: लावणीच्या तालावर थिरकली श्रद्धा कपूर! कलाकारांसोबत फुगडी खेळतानाचा VIDEO चर्चेत
3

Shraddha Kapoor: लावणीच्या तालावर थिरकली श्रद्धा कपूर! कलाकारांसोबत फुगडी खेळतानाचा VIDEO चर्चेत

China News :चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव
4

China News :चीनच्या रसायनांचा जगभर बोलबाला! घरातील रंगांपासून शॅम्पूपर्यंत प्रत्येक वस्तूत चिनी रसायनांचा शिरकाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.