
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुविधा केंद्रावर मोठा हल्ला; बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO
दरम्यान अँटोनियो गुटेरस यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसा युद्धा गुन्हा ठरवले आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सुदानी सैन्याने या हल्ल्यासाठी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) ला जबाबदार धरले आहे. RSF सुदानमधील कुख्यात निमलष्करी गट आहे. हा गट गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ देशात नियंत्रणासाठी युद्ध करत आहे. परंतु अद्याप संयुक्त राष्ट्रावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याच वेळी सुदानच्या लष्कराने या हल्ल्यात बंडखोर मिलिशिया आणि त्यांच्या सैनिकांचा हात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुविधा केंद्रातून धूर निघताना दिसत आहे. तेलाने समृद्ध असलेल्या अबेई सुदान भागा हा हल्ला झाला आहे. हा प्रदेश अत्यंत वादग्रस्त आहे. २०११ पासून सुदानाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून येथे संयुक्त राष्ट्र तैनात आहे.
DRONE attack kills 6 Bangladeshi UN peacekeepers in Sudan Thick SMOKE and FLAMES rise from strike site — Arab News footage pic.twitter.com/rf27177rKR — RT (@RT_com) December 13, 2025
सुदानमध्ये दोन वर्षाहून अधिक काळापासून गृह युद्ध सुरु आहे. सुदानमध्ये सशस्त्र दल (SAF) आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) हे दोन गट सुदानवर आपल्या वर्चस्वासाठी सतत संघर्ष करत असतात. दोन्ही गटांतील संघर्षामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत 24,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या दक्षिण सुदामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला असून संयुक्त राष्ट्रावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.