Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुदानमध्ये भीषण नरसंहार! गृहयुद्धात आता ड्रोन्सची एन्ट्री; हल्ल्यात ७० हून अधिक ठार, अनेक जखमी

Suadan Civil War : सुदानमध्ये पुन्हा एकदा गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत वादाने आता भयंकर रुप धारण केले असून यामध्ये डोन्सचा वापर करण्यात आला आहे. ताज्या ड्रोन हल्ल्यात ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 09:17 AM
Drone Strikes In Sudans Kordofan Region

Drone Strikes In Sudans Kordofan Region

Follow Us
Follow Us:
  • सुदानमध्ये मृत्यूचा तांडव
  • गृहयुद्धाला पुन्हा सुरुवात
  • ड्रोन हल्ल्यात ७७ ठार, अनेक जखमी
Sudan Civil War : खार्तूम : सुदानमध्ये पुन्हा एकदा गृहयुद्धाला (Sudan Civil war) सुरुवात झाली आहे. नुकतेच सुदानच्या कोर्डोफान प्रांतात भीषण ड्रोन हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यांमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सूदान डॉक्टर्स नेटवर्क या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुदानमध्ये युद्धाची आग धगधगत आहे. आतापर्यंत ड्रोन हल्ल्यात ७७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या संघर्षामुळे तीव्र ड्रोन युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sudan Violence : सूदानमध्ये लष्कराचा नागरिकांवर रक्तरंजित प्रहार ; ड्रोन हल्ल्यात लहान मुलांसह ५० जणांचा मृत्यू

सुदानमध्ये गृहयुद्धाला पुन्हा सुरुवात

गेल्या तीन वर्षांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) मध्ये सत्ता वर्चास्वावरुन संघर्ष सुरु आहे. एप्रिल २०२३ नंतर या संघर्षाने तीव्र रुप धारण केल असून आतपार्यंत या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच झालेल्या ताज्या हल्ल्यांनी सुदानमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातचावरण पसरले आहे. RSF वर दाट लोकवस्तीमध्ये ड्रोन हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुदानमधील स्थानिक नागरिकांचा निष्पाप बळी जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या अहवालानुसार, आतपर्यंतच्या संघर्षात सुमारे ४०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे, १.२ कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुदानच्या कोर्डोफोन क्षेत्रात सतत हवाई हल्ले आणि ड्रोन्सचा वापर  वाढल्याने ते युद्धाचे मुख्य केंद्र बनले आहे. मात्र यामुळे सामान्यांचे दैनंदिन जीव विस्कळीत झाले आहे.

RSF कडून ड्रोन हल्ल्यांचे प्रमाणा अधिक वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठा, रुग्णालये, निवासी वस्तींमध्ये हल्ले केले जात आहे. यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दोन आठवड्यांपूर्वी, सुदान लष्कराने दक्षिण कॉर्डोफान प्रांताची राजधानी कदुगली आणि शेजारच्या डिलिंग शहराचा RSF चा वेढा तोडल्याचा दावा केला आहे.

संयुक्त राष्ट्राचा इशारा 

दरम्यान सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे सुदानमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे भीषण ड्रोन वॉरची चिंता व्यक्त केली जात आहे. शाळा आणि आरोग्य सुविधांच्या ठिकाणांना लक्ष केले जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे दुर्गम भागांमध्ये मदत पोहचणे देखील कठीण झाले आहे.

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुदानमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे?

    Ans: सुदानमध्ये गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष सुरु आहे. यामुळे सतत ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

  • Que: सुदानमध्ये कुठे झाला ड्रोन हल्ला?

    Ans: नुकत्याच ताज्या घटनेनुसार, सुदानच्या कोर्डोफान प्रांतात निमलष्करी दलाने ड्रोन हल्ले केले आहेत.

  • Que: सुदानच्या कोर्डोफान येथील ड्रोन हल्ल्यात किती जीवीतहानी झाली?

    Ans: सुदानच्या कोर्डोफान येथील ड्रोन हल्ल्यात ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: संयुक्त राष्ट्रांनी सुदानमधील परिस्थिती बाबात काय म्हटले?

    Ans: संयुक्त राष्ट्रांनी सुदानमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन्सचा वापर वाढत असून नागरिकांसाठी विनाशकारी ठरु शकतो असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राने भीषण ड्रोन युद्धाची चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Drone strikes in sudans kordofan region killed 77 many injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • sudan crisis
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.