Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला जपान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जपानध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज अचानक भूकंप झाल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2025 | 09:32 PM
Japan Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला जपान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Close
Follow Us:

क्यूशू: जपानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. जपानच्या क्यूशू भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये 6.0  रिश्टर स्केलचा धक्के जाणवले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे संत वाजण्याच्या सुमारास जपानच्या क्यूशू राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.

जपानमध्ये या भूकंपाचे धक्के बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जपानध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज अचानक भूकंप झाल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवू लागताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी झाली नसल्याचे समजते आहे.

म्यानमारमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर

म्यानमारमध्ये शुक्रवारी 28 मार्च रोजी 7.7 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला. या विनाशकारी भूकंपामुळे मृतांची संख्या 2 हजार 56 वर पोहचली आहे. तसेच 3 हजार 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुमारे 270 लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 7.7 रिश्ट स्केल तीव्रतेचा या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरु असन मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने या भयानक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे.

एका महिलेचा प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडले शहरातील ग्रेट वॉल हॉटेलच्या मलब्यातून एका महिलेला सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. तीन दिवसानंतर कोणाल तरी जिंवत वाचवण्यात यश मिळणे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. म्यानमारमधील चिनी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती स्थिर आहे. भूकंप केंद्र मांडले शहराच्या जवळ असल्याने यामुळे थायलंडसह अनेक शेजारील देशांमध्येही या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आणि इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बँकॉकमध्ये बचाव कार्य सुरु

म्यानमारच्या या भूकंपामुळे बँकॉकमध्येही तीव्र धक्के जाणवले आहे. यामुळे कोसळलेल्या गगनचुंबी इमारतीचा मलब्यात 76 जण0 अडकले आहेत. या 76 जणांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. या दुर्दैवी घटनेत थायलंडमध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय मदत

मान्यमारमध्ये गृहयुद्धामुळे अनेक समस्या आहेत. याचवेळी या भूकंपामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या आपत्तीत सुमारे 23 हजाराहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. भारतासह अनेक देश आणि संयुक्त राष्ट्र (UN) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी बचाव पथके जागतिक पातळीवर कार्य करत आहेत. नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य केले जात आहे.

Earthquake in Myanmar: म्यानमारमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर; मृतांचा आकडा 2000 पार, बचाव कार्य सुरु

भारताचे ‘ऑपरेशन ब्रह्म’

भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.

भविष्यात आणखी धक्क्यांची शक्यता

USGS आणि भूकंपतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, म्यानमारमध्ये आणखी काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता आहे. सरकारने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारमधील ही आपत्ती अत्यंत भयानक आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Earthquake in japan country 60 richter scale atmosphere of fear among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • Earthquake
  • Japan
  • japan news

संबंधित बातम्या

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले
1

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
2

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
3

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका
4

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.