Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

एका अहवालानुसार पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी बैठक होऊ शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 07:23 AM
दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या युद्धामुळे मोठे संकट जगाला सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक मुस्लिम देश एकत्र येणार असून, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती दिली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील पाच दिवसांसाठी इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की, इराणसोबत शस्त्रसंधी चर्चा सुरू आहे. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. दरम्यान, एका अहवालानुसार पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी बैठक होऊ शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : Hormuz Strait crisis : भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी? 

या अहवालानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केल्यानंतर राजनैतिक हालचाली तीव्र झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे पाच दिवसांसाठी हल्ले थांबवण्यात आले आहेत.

पाकिस्तानही युद्ध थांबवण्यासाठी पुढे

पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे दोन्ही देशांना वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी पडद्यामागे काम करत आहेत. एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इस्लामाबादमध्ये एक बैठक आयोजित करण्यासाठी संपर्क सुरू आहे, ज्यामध्ये अमेरिका आणि इराणचे उच्चस्तरीय प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात.

इस्लामाबादमध्ये चर्चा होण्याची शक्यता

युद्ध संपवण्यासाठी या आठवड्यात इस्लामाबादमध्ये चर्चा होऊ शकते. पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : World War 3 : “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार

Web Title: Efforts underway to stop iran us war several muslim nations unitewill a key meeting take place in islamabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • international news
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
4

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.