Egypt submarine 6 feared dead after tourist Boat sinks in Red Sea off Egypt's coast
कैरो: इजिप्तमध्ये एक मोठी दुर्घटना घडील आहे. इजिप्तच्या हुरघाडा शहराच्या समुद्रकिन्याजवळ गुरुवारी (27 मार्च) सकाळी एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याची माहिती सोमर आली आहे. या भीषण दुर्घटनेत किमान 6 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर बचाव पथकाला 29 जणांना वाचवण्यात यश आले आहे. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजिप्तमधील गुरघाडा किनाऱ्यावर बुडालेल्या या पर्यटक पाणबुडीचे नाव सिंदबाद होते. या पाणबुडीत सुमारे 44 प्रवासी होते.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन, जखमींसाठी 21 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. सिंदबात पाणीबुडीत एकूण 44 प्रवासी होते. हे प्रवासी वेगवेळ्या देशांचे रहिवासी होते. इजिप्तच्या लाल समुद्राच्या खोलवर प्रवाळ आणि उष्णकटिबंधीय माशांच्या शोधात प्रवासी निघाले होते. दरम्यान मोठी दुर्घटना घडली आणि पाणबुडी समुद्रात 72 फूट खोलीपर्यंत गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप पाणबुडीचे अचानक बुडण्याचे कारण समोर आलेले नाही. सध्या याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
सिंदबाद पर्यचन पाणबुडी अनेक वर्षांपासून पर्यटकांना पाण्याखाली प्रवासाची संधी देते. लाला समुद्राच्या आत 25 मीटर म्हणजे 72 फूट खोलीवर अंतरावर जाण्याची क्षमत या सिंदबाद पाणबुडीमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी जगातील 14 मनोरंजात्मक पाणबुडींपैकी एक आहे. ही पाणबुडी फिनलंडमध्ये तयार करण्यात आली होती. या पाणबुडीमध्ये 44 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सना म्हणजे 46 जणांना समुद्रात नेण्याची क्षमता आहे.
बातमी अपडेट होत आहे.