Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

Sarah Khalifa : 'मिशन इम्पॉसिबल' या कार्यक्रमातील भूमिकेसाठी ओळखली जाणारी सारा खलिफा, शिक्षा सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर ढसाढसा रडली. तिने स्वतःला निर्दोष घोषित केले आणि दयेची याचना केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 06, 2026 | 04:14 PM
Sarah Khalifa TV presenter death penalty Egyptian TV anchor sentenced to death

Sarah Khalifa TV presenter death penalty Egyptian TV anchor sentenced to death

Follow Us
Follow Us:
  • अमली पदार्थांच्या तस्करीत मृत्युदंडाची शिक्षा
  • कोर्टात ढसाढसा रडली निवेदिका
  • ७५० किलो अमली पदार्थ जप्त

टीव्हीच्या पडद्यावर सुरक्षा, कायदा आणि गुन्हेगारीच्या घटनांवर भाष्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली इजिप्शियन टीव्ही निवेदिका सारा खलिफा (Sarah Khalifa) हिचे आयुष्य एका रात्रीत पार बदलून गेले आहे. इजिप्तमधील (कैरो येथील फौजदारी न्यायालयाने अमली पदार्थांचे उत्पादन, बेकायदेशीर साठवणूक आणि आंतरराष्ट्रीय तस्करीत दोषी ठरवत सारा खलिफासह एकूण १२ आरोपींना फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकल्यानंतर सारा खलिफा न्यायालयातच ढसाढसा रडू लागली आणि तिने न्यायाधीशांसमोर स्वतःला निर्दोष सांगत दयेची याचना केली.

३९ वर्षीय सारा खलिफा ही इजिप्शियन प्रसारमाध्यमांमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध चेहरा मानली जात होती. ती मुख्यत्वे ‘मिशन इम्पॉसिबल’ (Mission Impossible) या तिच्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमासाठी ओळखली जात असे, ज्यामध्ये देशातील कायदा, सुरक्षा आणि गुन्हेगारीच्या क्लिष्ट प्रकरणांचे विश्लेषण केले जायचे. टीव्ही अँकरिंगव्यतिरिक्त ती एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील होती; तिचे स्वतःचे कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. सोशल मीडियावरही तिची प्रचंड क्रेझ होती आणि एकट्या इंस्टाग्रामवर तिचे २६ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

७५० किलो अमली पदार्थ अन् निवासी घरात प्रयोगशाळा

इजिप्तची सरकारी वृत्तसंस्था ‘अल अहरम’ (Al-Ahram) आणि ‘अखबार अल-यौम’ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा खटला कैरो उच्च न्यायालयात एकूण २८ आरोपींवर चालवण्यात आला होता. तपासात समोर आले की, या गुन्हेगारी टोळीने परदेशातून कच्चा माल आयात करून कृत्रिम अमली पदार्थ (Synthetic Drugs) बनवण्याचे एक मोठे जाळे तयार केले होते. हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी शहरातील निवासी भागांमधील दोन अपार्टमेंट्सचा वापर खाजगी प्रयोगशाळा म्हणून केला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

सुरक्षा दलांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये या टोळीकडून ७५० किलोग्रॅमपेक्षा जास्त अमली पदार्थ आणि कच्चा माल हस्तगत केला. याशिवाय आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे आणि जिवंत दारुगोळाही जप्त करण्यात आला. तपासात असाही आरोप करण्यात आला की, सारा खलिफाने या रॅकेटसाठी आर्थिक मदत पुरवली आणि टोळीतील महत्त्वाच्या सूत्रधारांना भेटण्यासाठी परदेश दौरेही केले होते.

न्यायालयात रडून दयेची याचना आणि ‘ग्रँड मुफ्ती’ यांची मंजुरी

सुनावणीदरम्यान निकाल जाहीर होताच सारा खलिफा अत्यंत भावूक झाली आणि न्यायालयाच्या आवारातच ढसाढसा रडू लागली. तिने न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत म्हटले, “साहेब, कृपया माझे ऐका. माझ्या आई-वडिलांनी मला अतिशय चांगल्या संस्कारात वाढवले आहे. ते धार्मिक आणि देवभक्त लोक आहेत. मला अमली पदार्थांच्या काळ्या पैशांची मुळीच गरज नाही.” तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही सिगारेटलाही स्पर्श केलेला नाही आणि तिला या प्रकरणात नाहक अडकवले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Germany: अंतराळ क्षेत्रात युरोपचा नवा अध्याय! जर्मन कंपनीच्या ‘स्पेक्ट्रम’ रॉकेटचे यशस्वी उड्डाण; 5 उपग्रह अवकाशात स्थापित

इजिप्तच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार, कोणत्याही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यापूर्वी देशाच्या ‘ग्रँड मुफ्ती’ (Grand Mufti) यांचे धार्मिक मत घेणे बंधनकारक असते. न्यायालयाने ग्रँड मुफ्तींकडे हे प्रकरण पाठवले होते, ज्यांच्या धार्मिक मान्यतेनंतर न्यायालयाने १२ आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. या प्रकरणात न्यायालयाने इतर ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, इजिप्तमध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाविरोधात अत्यंत कठोर कायदे आहेत. २०२५ मध्ये इजिप्शियन न्यायालयांनी ५४१ हून अधिक लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सारा खलिफाचे वकील या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Court of Cassation) अपील करण्याची शक्यता आहे.

Web Title: Egyptian tv presenter sarah khalifa sentenced to death in drug case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Egypt
  • World news

संबंधित बातम्या

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
1

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
2

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.