
फोटो सौजन्य सोशल मीडिया
मिळालेल्या माहितीनुसार BAPS शी संबंधित सुमारे १०० जणांच्या हिंदू धार्मिक शिष्टमंडळाने आयफ़ेक टॉवरला खाजगी भेट दिली होती . या भेटीदरम्यान शिष्टमंडळातील काही सदस्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क टाळण्याची विनंती केल्याचा आरोप आहे .
या विनंतीनंतर काही महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणाहून बाजूला करण्यात आल्याचे सांगण्यात आले . त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला . ही बाब समोर आल्यानंतर आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला .
Indus River Project : लडाखमध्ये सिंधू नदीवर भारताचा पहिला रॉक चेक डॅम; ४ कोटी लिटर पाणी साठवणार
या घटनेच्या निषेधार्थ आयफेल टॉवरमधील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले . त्यामुळे जगभरातून पॅरिसला आलेल्या पर्यटकांना मोठा फटका बसला आणि आयफेल टॉवर काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला . आयफेल टॉवरचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे .
महिला कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवण्याची मागणी स्वीकारणे चुकीचे होते , अशी भूमिका व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली . या प्रकरणामुळे फ्रान्समध्ये लैंगिक समानता , धार्मिक , स्वातंत्र आणि सार्वजनिक संस्थांमधील समान वागणूक यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे .
Gaza Crisis : गाझातील पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याच्या योजनेवरून वाद
वाद वाढल्यानंतर पॅरिस प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली . फ्रान्समधील राजकीय स्तरावरूनही या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या आहेत . दरम्यान BAPS कडून या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून , कोणत्याही व्यक्तीला त्रास देण्याचा किंवा भेदभाव करण्याचा हेतू न्हवता . असे सांगण्यात आले आहे . तसेच या घटनेमुळे कोणाला दुखावले गेले असल्यास खेद व्यक्त करण्यात आला आहे .
या संपूर्ण वादामुळे आयफेल टॉवर सारख्या जगप्रसिद्ध सार्वजनिक स्थळांवर धार्मिक भावना आणि समानतेच्या तत्वांमध्ये समतोल कसा साधायचा ,हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे . तसेच जगभरात भारतीय नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारची पाश्चिमात्य संस्कृतीला न पटणारी सार्वजनिक वागणूक घडत असून , भारतीयांबद्दलचे मत बदलू लागले आहे . असेही वेगवेगळ्या अहवालातून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे .