
France protest luxury store looting Louis Vuitton Rolex looting France
युरोपमधील सर्वात शांत आणि प्रगत देशांपैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये सध्या सामाजिक आणि राजकीय अशांततेचे भीषण वातावरण पाहायला मिळत आहे. सरकारविरोधी आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरली असून, या निदर्शनांना आता हिंसक वळण आले आहे. आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक आणि मुखवटाधारी गटांनी फ्रान्समधील (France Protest) प्रमुख शहरांतील अति-आलिशान (Luxury Brands) दुकानांना लक्ष्य केले आहे. पॅरिस, मार्सेल आणि बोर्डो यांसारख्या शहरांमध्ये झालेल्या तोडफोडीत लाखो युरो किमतीचा डिझायनर माल लुटण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही चोरी झालेली उत्पादने आता रस्त्यावर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघडपणे अत्यंत स्वस्त दरात विकली जात आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान उच्चभ्रू रिटेल दुकानांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या एकाच दिवसाच्या हिंसाचारात अंदाजे ४.२५ दशलक्ष युरो (सुमारे ३८ कोटी रुपये) किमतीचा आलिशान माल चोरीला गेला आहे. लुटण्यात आलेल्या मालामध्ये केवळ कपडे किंवा सामान्य वस्तू नसून जगातील सर्वात महागड्या ब्रँड्सच्या डिझायनर हँडबॅग्ज, आलिशान घड्याळे, महागडे परफ्यूम्स आणि कॉस्मॅटिक्सचा समावेश आहे. फ्रान्समधील प्रमुख पर्यटन आणि व्यापारी केंद्रांवर झालेल्या या हल्ल्यामुळे जागतिक रिटेल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्सेल शहरात असलेल्या प्रसिद्ध ‘रोलेक्स’ (Rolex) या महागड्या घड्याळांच्या शोरूमची तोडफोड करून सुमारे ३ दशलक्ष युरोचे नुकसान करण्यात आले. तर दुसरीकडे, बोर्डो शहरातील जगप्रसिद्ध ‘लुई व्हिटॉन’ (Louis Vuitton) च्या दुकानातून अंदाजे १.२५ दशलक्ष युरो किमतीचा माल पळवून नेण्यात आला. याशिवाय सेलीन (Celine), हर्मेस (Hermès) आणि डिओर (Dior) यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या ब्रँड्सनाही या हिंसेचा थेट फटका बसला आहे.
🇫🇷 #AHORA| Tras los disturbios en París, el lujo cambia de vitrina‼️ Las calles de Francia se han convertido en un mercado de todos los artículos de diseño de alto valor robados de las
tiendas saqueadas: Rolex, Louis Vuitton, Gucci y muchos más.. https://t.co/RDLLxleb5D — Liliana Franco (@lilianaf523) October 20, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
मास्क घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या उपद्रवींच्या टोळक्यांनी दुकानांच्या काचा फोडून काही मिनिटांतच संपूर्ण शोरूम रिकामे केले. या घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये लोक हातात महागड्या हँडबॅग्ज आणि घड्याळांचे बॉक्स घेऊन पळताना स्पष्ट दिसत आहेत. या नुकसानामुळे फ्रान्समधील व्यापारी वर्गात प्रचंड घबराट आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानांमधून माल लुटल्यानंतर आता या चोरट्यांनी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये अनधिकृत दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर आणि गल्लीबोळात हे लुटलेले सामान उघड्यावर विकले जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्या हँडबॅग्ज आणि परफ्यूम्सची मूळ किंमत लाखांच्या घरात आहे, त्या वस्तू नेहमीच्या किरकोळ किमतीपेक्षा ८० ते ९० टक्के इतक्या प्रचंड सवलतीत विकल्या जात आहेत.
🚨 Protests in Paris escalate as luxury boutiques, including CELINE, Dior, Burberry and Louis Vuitton, are reportedly damaged and looted. What began as student-led demonstrations over school conditions has reportedly grown into wider anti-government protests, reflecting broader social and economic grievances across France. 🎥 @zakariaabdelkafi | @laveulliure | @ctrlibre — ☻ (@NoExtraFeelings) October 18, 2026
credit – social media and Twitter
काही स्थानिक विक्रेते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना रोखून या ब्रँडेड वस्तू अगदी क्षुल्लक किमतीत विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओंमध्ये खरेदीदार आणि विक्रेते या वस्तूंच्या किमतींवरून घासाघिस करतानाही दिसत आहेत. तथापि, सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू खरंच लुटलेल्या आहेत की बनावट (First Copy) आहेत, याची तपासणी सध्या फ्रान्स पोलीस करत आहेत.
केवळ रस्त्यांवरच नाही, तर इंटरनेटच्या माध्यमातूनही या चोरीच्या मालाची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुन्या आणि वापरलेल्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी युरोपमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘विंटेड’ (Vinted) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा संशयास्पद उत्पादनांच्या जाहिरातींची पूर आला होता. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, हिंसाचार शांत होताच काही तासांच्या आत या प्लॅटफॉर्मवर लुई व्हिटॉन आणि हर्मेसच्या ब्रँडेड बॅग्सच्या अनेक नव्याने सूचीबद्ध केलेल्या जाहिराती दिसू लागल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय
या जाहिरातींचे स्वरूप पाहता त्या लुटलेल्या मालाशी संबंधित असल्याचा संशय बळावला. या घटनेची गंभीर दखल घेत ‘विंटेड’ कंपनीने तातडीने निवेदन प्रसिद्ध केले. चोरीच्या किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या वस्तूंची विक्री आपल्या प्लॅटफॉर्मवर सह्य केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी अशा सर्व संशयास्पद खात्यांवर आणि सूचींवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आणि सायबर सेलच्या मदतीने या जाहिराती टाकणाऱ्या युजर्सचा शोध घेतला जात आहे.
फ्रान्समधील या अभूतपूर्व परिस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनाच्या आडून झालेली ही लूटमार केवळ आर्थिक नुकसान नसून देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही मोठा धक्का देणारी ठरली आहे. व्यापारी संघटनांनी सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची आणि लुटारूंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. फ्रान्स पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया व्हिडिऑच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.