
elon musk ashley st clair lawsuit grok ai deepfake controversy romulus custody 2026
Elon Musk Ashley St. Clair lawsuit Grok AI : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी हा वाद त्यांच्या व्यवसायाशी नाही, तर त्यांच्या वैयक्तिक नात्याशी आणि त्यांनी विकसित केलेल्या ‘ग्रोक’ (Grok AI) या चॅटबॉटशी संबंधित आहे. मस्कच्या १६ महिन्यांच्या मुलाची, रोम्युलसची आई, २७ वर्षीय अॅशले सेंट क्लेअर यांनी मस्कच्या एआय कंपनी ‘xAI’ विरोधात न्यू यॉर्क सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे. या खटल्यामुळे एआयच्या सुरक्षिततेवर आणि मस्कच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अॅशले सेंट क्लेअर, जी स्वतः एक लेखिका आणि राजकीय भाष्यकार आहे, तिचा आरोप आहे की मस्कच्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवरील ग्रोक एआयने वापरकर्त्यांच्या सांगण्यावरून तिचे अनेक लैंगिकदृष्ट्या स्पष्ट आणि आक्षेपार्ह ‘डीपफेक’ फोटो तयार केले. अॅशलेने दावा केला आहे की, जेव्हा तिने या फोटोंबद्दल तक्रार केली, तेव्हा मदतीऐवजी कंपनीने तिचे ‘प्रीमियम’ सबस्क्रिप्शन काढून टाकले आणि तिचे खाते डिमॉक्रेटीझ (Demonetize) करून तिच्यावर एकप्रकारे सूड उगवला.
खटल्यातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे अॅशलेच्या बालपणीच्या फोटोंचा गैरवापर. अॅशलेच्या मते, ग्रोकने ती केवळ १४ वर्षांची असतानाचा एक पूर्ण कपड्यातील फोटो घेतला आणि एआयच्या मदतीने तिला बिकिनीमध्ये दाखवण्यासाठी तो एडिट केला. इतकेच नाही तर, अॅशले ज्यू (Jewish) समुदायाची असतानाही, तिच्या काही नग्न प्रतिमांवर ‘स्वस्तिक’ सारखी चिन्हे लावण्यात आली, ज्यामुळे तिला केवळ मानसिक त्रास झाला नाही तर तिचा सार्वजनिक अपमानही झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HinduACTion: 10 फेब्रुवारीला अमेरिकेत काय होणार? हिंदूंच्या रक्षणासाठी उत्सव चक्रवर्ती यांनी मांडला ‘ॲक्शन प्लॅन’
अॅशले आणि मस्क यांचे नाते मे २०२३ मध्ये एका मीमवरून सुरू झाले होते. मे २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचा, रोम्युलस (Romulus) चा जन्म झाला. मस्क यांनी सुरुवातीला हे नाते गुप्त ठेवले होते, मात्र २०२५ च्या अखेरीस त्यांच्यात मतभेद झाले. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की ते रोम्युलसच्या पूर्ण ताव्यासाठी (Full Custody) अर्ज करणार आहेत. मस्कच्या या दाव्यानंतर काही तासांतच अॅशलेने हा एआय संबंधित खटला दाखल केल्याने, हा वाद आता केवळ तंत्रज्ञानाचा उरला नसून तो कौटुंबिक युद्धाचे रूप घेत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Senate: पुरुष अन् गर्भधारणा? डॉ. निशा वर्मांच्या उत्तराने विज्ञान विश्व थक्क; अमेरिकन सिनेटमधील ‘त्या’ वादाचा VIDEO VIRAL
या प्रकरणानंतर मस्क यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या देशांनी ग्रोक एआयवर आधीच तात्पुरती बंदी घातली आहे, कारण हा चॅटबॉट महिलांचे आणि मुलांचे अश्लील फोटो तयार करण्यासाठी वापरला जात आहे. मस्क यांनी स्पष्टीकरण दिले आहे की एआय स्वतःहून फोटो बनवत नाही, तर वापरकर्ते तसे आदेश देतात. मात्र, अॅशलेच्या वकिलांनी ‘xAI’ ला “सार्वजनिक उपद्रव” (Public Nuisance) म्हटले असून मस्क यांच्या कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.