Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नोटीसनंतर एलन मस्कच्या एआय प्लॅटफॉर्मने 3,500 कंटेंट ब्लॉक केला. यासोबतच ग्रोकने त्यांची चूक मान्य करत भारतीय कायद्यानुसार काम करण्यास संमती दर्शवली आहे. मात्र ग्रोकवर व्हायरल ट्रेंडचा फार गंभीर परिणाम झाला आहे. व्हायरल बिकीनी ट्रेंड आणि अश्लील कंटेटच्या आरोपानंतर आता दोन देशांनी या एआय प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरल बिकीनी ट्रेंड, अश्लील कंटेट आणि डीपफेक कंटेंटचे प्रसारण या सर्व आरोपांनंतर दोन देशांनी या एआय प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – Pinterest)
एलन मस्कच्या एआय चॅटबॉट ग्रोकवर इंडोनेशिया आणि मलेशियाने बंदी घातली आहे. xAI च्या एजेंटिक चॅटबॉटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अनेक गंभीर आरोपांमुळे ग्रोक सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा की नाही, त्यावर आपले फोटो शेअर करायचे की नाही, असा प्रश्न आता अनेक यूजर्सच्या मनात उपस्थित झाला आहे. एलन मस्कच्या एआय प्लॅटफॉर्मवर भारत, यूरोप, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेटप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या देशांनी एआयद्वारे तयार केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेट प्रसारित केल्याबद्दल ग्रोक यांना समन्स बजावले होते.
मलेशिया कम्युनिकेशन आणि मल्टीमीडिया कमीशनच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रोकवर मलेशियामध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तर इंडोनेशियाच्या कम्युनिकेशन आणि डिजिटल मिनिस्टर Meutya Hafid ने ग्रोकची सर्विस बॅन करण्याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. मलेशिया सरकारती एजेंसी MCMC ने सांगितलं आहे की, ग्रोकच्या मदतीने अश्लील कंटेट जनरेट करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. हे प्रकरण थांबवण्यासाठी एआय प्लॅटफॉर्मने कोणतीही कारवाई केली नाही.
ग्रोकवर महिला आणि लहान मुलांच्या फोटोंचा वापर करून आक्षेपार्ह कंटेट तयार केला जात आहे आणि प्रसारित केला जात आहे. मात्र असं करणं कायद्याचं उल्लंघण आहे. याप्रकरणी X आणि xAI दोन्हीला 3 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी नोटीस जारी करण्यात आली आणि याबाबत कारवाई करण्यास सांगितलं आहे. एमसीएमसी पुढे म्हणाले की एक्स केवळ यूजरने सुरू केलेल्या रिपोर्टिंग यंत्रणेवर लक्ष केंद्रित करते. या सर्वांनंतर एआय चॅटबॉट ग्रोकवर इंडोनेशिया आणि मलेशियाने बंदी घातली.
Ans: Grok AI चा वापर चॅटबॉट, API, ब्राउझर प्लग-इन किंवा इंटीग्रेटेड ऍप्लिकेशन्समध्ये करता येतो, जिथे वापरकरता संवादात्मक AI उत्तरांची गरज असते.
Ans: होय. Grok AI वापरकर्ता गोपनीयता आणि सुरक्षितता मानकांचे पालन करतो, पण संवेदनशील माहिती टाकताना काळजी घ्या.
Ans: Grok AI अनेक भाषा समजतो आणि उत्तर देऊ शकतो, परंतु इंग्रजीमध्ये सर्वाधिक परफॉर्मन्स मिळते.






