Elon Musk joins Trump's first White House Cabinet meeting
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक आणि DOGE (Department of Government Efficiency) चे प्रमुख आणि ट्रम्प यांचे मित्र एलॉन मस्क यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मोठ्या प्रमाणात सरकारी कपातींवर व्यापक टीका करण्यात आली. याच दरम्यान मस्क यांनी एक खळबळजनक दावा केला. त्यांनी म्हटले की, मला जीवे मारण्याच्या धमक्या येते आहेत.
ट्रम्प यांनी केले एलॉन मस्कचे कौतुक
DOGE हे अमेरिकन सरकारी खर्च कमी करुन प्रशासन कार्यक्षण बनवण्याच्या उद्देशाने सुरु करम्यात आलेले खाते आहे. ट्रम्प यांनी मस्क यांनी विचारले की, हे खाते किती बचत करत आहे. तसेच त्यांनी “हा माणूस खूप यशस्वी आहे. तो खूप मेहनत घेतो. त्याच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी टीकही होत आहे. मात्र हे अपेक्षितच आहे असे ट्रम्प म्हणाले”
🚨BREAKING: Elon Musk Delivers Remarks at the First Official Trump Cabinet Meeting 🔥
“I consider myself humble tech support. It is not optional to balance this budget, is it essential. I’m receiving a lot of death threats, I could stack them up. I believe we can actually find a… pic.twitter.com/JbVRe3FZSF
— Autism Capital 🧩 (@AutismCapital) February 26, 2025
मस्क यांची प्रतिक्रिया
यावर मस्क यांनी म्हटले की, “ मी एक साधा टेक्निकल सपोर्ट आहे” सरकारी संगणक प्रणाली सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. येथे अनेक प्रणाली जुन्या आहेत, त्यात अनेक चुका आहेत. यामुळे आम्ही प्रत्यक्षात टेक्निकल सपोर्टचे काम करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.”
अमेरिका दिवाळखोर होऊ शकते
एलॉन मस्क यांनी, DOGE संघटनेचे मुख्य काम सरकारी अडचणींवर नियंत्रणे ठेवणे आहे. तसेच आम्ही खर्च कमी केला नाही, तर अमेरिका दिवाळखोर होईल असेही त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, दररोज 4 अब्ज डॉलर्सची बचत करुन आर्थिक वर्ष 2026 पर्यंत अडचणींवर मात करणे या विभागाचे लक्ष्य आहे.
DOGE चुका करेल पण सुधारेलही
मस्क यांनी सांगितले की, कदाचित DOGE विभागाकडून चूकाही होती, पण आम्ही त्या लवकर दुरुसत् करण्याचा प्रयत्न करु. तसेच USAID अंतर्गत इबोला प्रतिबंध कार्यक्रम चुकून रद्द करण्यात आला होता, पण DOGE ने तो पुन्हा सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.
नोकऱ्या गमावलेल्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मस्क यांच्या कठोर निर्णयांविरोधात अनेक सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अनेकांनी राजीनामे दिले आहेत, मात्र काहींनी याविरोधात याचिका दाखल केली आहे. सध्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या सरकारी कर्मचारी संघटनेने (AFGE) मस्क यांना अविचारी ठरवले असून बेकायदेशीर काढून टाकण्यात्या त्यांच्या निर्णयाविरोधात लढा सुरु केला आहे. आतापर्यंत 1 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.