अशी ही बनवा बनवी! 'या' देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तब्बल 13 वेळी बनली बहुरुपी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या अमेरिकेच्या नागरित्वावरुन गोंधळ सुरु असून याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून एका 61 वर्षीय महिलने ब्रिटीश नागरिकत्व मिळण्यासाठी असे काही केले आहे यामुळे तिला 20 वर्षाची शिक्षा मिळाली आहे. या महिलेचे नाव जोसेफिन मॉरिस असून या महिलेने 13 वेगवेगळ्या पुरुष आणि महिलांच्या वेषात ‘लाइफ इन द यूके टेस्ट’ दिली. या महिलेने मंगळवारी (25 फेब्रुवारी) आपला गुन्हा बकूल केला.
खरी ओळख लपवून विविध चाचणी केंद्रांमध्ये परिक्षा
लाइफ इन द यूके टेस्ट ही परिक्षा ब्रिटीश नागरिकत्व किंवा कायमस्वरुपी निवासासाठी देणे आवश्यक असते. मॉरिसने आपली ओळख लपवण्यासाठी विग आणि मेकअपची साधने वापरून वेश बदलाला. यामुळे ती वेगवेगळ्या अर्जदारांसारखी दिसू शकेल. 2022 ते 2023 या कालावधीत विविध चाचणी केंद्रांमध्ये जाऊन परिक्षा दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, मॉरिसने पुरुषांचेही रुप धारण केले आणि आपले लिंग बदलल्याचे भासवले.
पैसे कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फसवणूक
ब्रिटनच्या गृह मंत्रालयाचे अधिकारी फिलिप पार यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व तिने केवळ पैसे कमवम्यासाठी केले. ती देशभरताली चणी केद्रांची नीट निवडण करुन, योजना बनवून फसवी कामगिरी करचत होती. ब्रिटीश इतिहास मूल्ये आणि समाजाविषयी असलेल्या 24 परिक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तिने अनेकांना मदत केली, यामुळे लोकांनी ब्रिटीश नागरिकत्व किंवा स्थायी निवास मिळू शकेल.
न्यायालयीन सुनावणी आणि शिक्षा
सध्या मॉरिस ब्रॉन्झफिल्ड तुरुंगात असून तिने व्हर्च्युअल पद्धतीने न्यायालयीन सुनावणीत भाग घेतला. तिने स्वत: कबूल केले की, तिने लोकांना ब्रिटीश नागरिकत्व मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या वेषात परिक्षा दिली. यासाठी तिने पैसेही घेतले. तिच्याकडे दोन व्यक्तींच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स आहे. या प्रकरणात मॉरिसला 20 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
ब्रिटनमध्ये नागरिकत्व मिळवण्याचे नियम
ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी विशिष्ट नियमावली आहे. कोणत्याही व्यक्तीला ब्रिटीश ब्रिटनमध्ये कायमस्वरुपी राहण्याची परवानगी घ्यावी लागते, जोपर्यंत ब्रिटीश नागरिकत्व मिळत नाही. याशिवाय, नागरिकत्व मिळेपर्यंत त्या व्यक्तीला तिथे राहण्याची संमती असावी. काही लोकांना ‘इंडेफिनिट लीव टू रिमेन’ किंवा ‘ईयू प्री-सेटल्ड स्टेटस’ असल्यास त्यांना ब्रिटनमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनिश्चित काळासाठी म्हणजेच युरोपियन युनियनकडून निश्चित कालवधीपर्यंत परवानगी असावी.